मनुष्याच्या स्पर्मसहीत ६७ लाख प्रजातींचे DNA चंद्रावर स्टोर करण्याचा प्लॅन, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 04:31 PM2021-03-15T16:31:42+5:302021-03-15T16:36:10+5:30
हे सगळं क्रायोजेनिकली फ्रोजन करून चंद्रावर ठेवलं जाऊ शकतं. हे ठेवण्यासाठी वैज्ञानिकाने नोहास आर्कप्रमाणे लूनर आर्क बनवून त्यात हे ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
अमेरिकेतील एक वैज्ञानिक म्हणाला की, त्याची इच्छा आहे की, चंद्रावर पूर्ण जगभरातून ६७ लाख प्रजातींचे DNA स्टोर केले जावे. यात पुरूषांचे स्पर्म, महिलांचं अंडकोष, झाडांच्या बीया, फंगस इत्यादींचा समावेश असेल. हे सगळं क्रायोजेनिकली फ्रोजन करून चंद्रावर ठेवलं जाऊ शकतं. हे ठेवण्यासाठी वैज्ञानिकाने नोहास आर्कप्रमाणे लूनर आर्क बनवून त्यात हे ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
एरिझोनाचा यूनिव्हर्सिटीती वैज्ञानिक जेकन थांगा म्हणाले की, पृथ्वीवर असलेल्या सर्वच प्रजातीचे DNA जर कशा रूपात चंद्रावर स्टोर केले गेले तर हे जग एक आधुनिक इन्शुरन्स पॉलिसी असेल. जेकन म्हणाले की, यासाठी आपल्या लूनर आर्क तयार करावा लागेल.
जेकन यांच्यानुसार लूनर आर्क एकप्रकारे जीन बॅंक असेल. जे एका ट्यूबसारखं असेल. ही चंद्राच्या अशा गुहांमध्ये ठेवायचं ज्या थंड झालेल्या लाव्हारसापासून तयार झाल्या आहेत. या गुहा ३०० कोटी वर्ष जुन्या आहेत. लूनर आर्कला सोलर पॅनल्सच्या माध्यमातून ऊर्जा दिली जाईल.
जेकन थांगा यांनी सांगितले की, या कामासाठी पृथ्वीवरून चंद्रासाठी साधारण २५० रॉकेट्स पाठवावे लागतील. जेकनच्या या गोष्टीवर जगभरातील अनेक वैज्ञानिकांनी सहमती दर्शवली आहे. वैज्ञानिकांचं मत आहे की, या योजनेमुळे पृथ्वीवरील जीव, झाडे आणि मनुष्य नैसर्गिक आपत्तीपासून वाचतील. याने त्यांचे जीन्स सुरक्षित राहतील.
जेकन म्हणाले की, आपल्यात आणि निसर्गात खोलवर संबंध आहे. जेकन हे एरिझोना यूनिव्हर्सिटीचे स्पेस अॅन्ड टेरेस्ट्रिअल रोबोटिक एक्सप्लोरेशन लेबॉरेटरीचे प्रमुख आहे. जेकन म्हणाले की, आपण आपली बायोडायवर्सिटी वाचवण्यासाठी अशाप्रकारचा प्रयत्न करू शकतो. असं नाही केलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक प्रजाती नष्ट होतील.
जर चंद्रावर अशाप्रकारचा लूनर आर्क तयार केला गेला तर याने पृथ्वीवरील जैवविविधता सुरक्षित राहील. ज्वालामुखी, भूकंप, त्सुनामी, पर्यावरण बदल, सौर वादळ किंवा दुष्काळ अशा काहीही समस्या आल्या तरी DNA किंवा जीन्स सुरक्षित राहतील.