VIDEO : इथे जीव मुठीत घेऊन केली जाते विंचवाची शेती, कोट्यावधी रूपये मिळतो फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 02:16 PM2024-03-18T14:16:28+5:302024-03-18T14:17:06+5:30
तुम्ही कधी विंचवाची शेती पाहिली का? नक्कीच पाहिली नसेल आणि तुम्हाला प्रश्नही पडला असेल की, विंचवाची शेती कशी केली जाते?
सोशल मीडियामुळे आपल्या जगभरातील अनेक गोष्टी सहजपणे माहीत पडतात. जगाच्या कानाकोपऱ्यात कोण काय करतं ते आपल्याला कळतं. आधी असं होत नव्हतं. अशा अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी सोशल मीडियाने समोर आणल्या आहेत. ज्या बघून किंवा वाचून लोक अवाक् होतात. काही गोष्टी तर अशा असतात ज्यांचा आपण कधी विचारही केलेला नसतो.
तुम्ही भाज्यांची किंवा धान्याची शेती पाहिली असेल किंवा कोंबडी पालन व शेळी पालनही पाहिलं असेल. पण तुम्ही कधी विंचवाची शेती पाहिली का? नक्कीच पाहिली नसेल आणि तुम्हाला प्रश्नही पडला असेल की, विंचवाची शेती कशी केली जाते? कारण विंचवाने जर दंश मारला तर व्यक्तीचा मृत्यू होतो. मग त्यांची शेती कशी होईल? शेतीच्या स्वरूपात शेकडो-हजारो विंचवांची देखरेख कशी केली जात असेल?
कशी करतात विंचवाची शेती?
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही एका रूममध्ये हजारोंच्या संख्येने विंचू बघू शकता. एकाच रूममध्ये ब्लॉक्स बनवून विंचवांना ठेवण्यात आलं आहे. त्यांना जेवण दिलं जातं आणि त्यांच्यावर औषधही शिंपडलं जातं. विंचवांची शेती करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण याने जीवाला धोकाही होऊ शकतो. आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की, विंचवांची शेती करायची कशाला? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
The inside of a scorpion farm
— Science girl (@gunsnrosesgirl3) March 17, 2024
How much pay would you need for a job like this?
pic.twitter.com/GZJlVULAYO
विंचवांची शेती मुख्यपणे दोन गोष्टींसाठी केली जाते. एक तर यांच्या विषाचा वापर औषधे तयार करण्यासाठी केला जातो. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांवर विंचवांच्या विषाचा वापर केला जातो. हेच विष जमा करण्यासाठी त्यांची शेती केली जाते. तुम्हाला कदाचित अंदाज नसेल, पण विंचवाचं एक लीटर विष इंटरनॅशनल मार्केटमध्ये 85 कोटी रूपयांपेक्षा किंमतीत विकलं जातं. एका विंचवामध्ये 2 मिलीलीटर विष असतं म्हणजे 500 विंचवाचं विष तुम्हाला कोट्याधीश बनवतं. एक विंचू तुम्हाला लखपती बनवू शकतो.