समुद्रात सापडली 40 वर्षाआधीची बॉटल, आत होता एक मेसेज आणि नकाशा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 04:24 PM2024-03-13T16:24:33+5:302024-03-13T16:25:36+5:30

स्मिथ नावाची एक महिला एका समुद्र किनाऱ्यावर सफाई करत होती. तेव्हाच तिला एक काचेची बॉटल सापडली. ज्यात काहीतरी रंगीत होतं.

Scottish students message in a bottle travels 6 miles in 40 years with a map in it | समुद्रात सापडली 40 वर्षाआधीची बॉटल, आत होता एक मेसेज आणि नकाशा...

समुद्रात सापडली 40 वर्षाआधीची बॉटल, आत होता एक मेसेज आणि नकाशा...

अनेकदा जगापासून दूर एखाद्या समुद्र किनाऱ्यावर काही वर्ष जुन्या अनेक वस्तू सापडतात, ज्या अवाक् करणाऱ्या असतात. काही वस्तू तर समुद्राच्या पाण्यावर तरंगत असतात आणि अनेकदा तर यांमध्ये काही संदेशही असतात. स्कॉटलॅंडच्या एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. 

स्मिथ नावाची एक महिला एका समुद्र किनाऱ्यावर सफाई करत होती. तेव्हाच तिला एक काचेची बॉटल सापडली. ज्यात काहीतरी रंगीत होतं. स्मिथने बीबीसीला सांगितलं की, मला वाटलं की यात आत फेल्ट-टिप पेनसारखं काही आहे. मी ते बाहेर काढलं तर याच्या चारही बाजूला इलास्टिक बॅंड गुंडाळला होता. हा एक रोल केलेला कागद होता. मी तो उघडून पाहिला तर त्यावर हाताने तयार केलेला एक नकाशा होता.

ती म्हणाली की, ज्यांनीही हा नकाशा तयार केला असेल त्यांनी फार हुशारीने बाहेरच्या रॅपिंगसाठी वॅक्स क्रेयॉनचा वापर केला होता. यामुळे हा कागद बॉटलमध्ये पाणी शिरल्यावरही सेफ होता. हा मॅप 8 वर्षाच्या तीन मुलींनी तयार केला होता, ज्या 1984 मध्ये प्रायमरी स्कूलमध्ये शिकत होत्या. 

पायरेट थीमवर तयार बनवलेल्या या नकाशावर मुलींनी मॅथ शिकवणाऱ्या टीचरबाबत तक्रार लिहिली होती. एका नोटमध्ये लिहिलं होतं की, 'कृपया माझी मदत करा. मी वॉर्मिट प्रायमरी स्कूलमधील एक मुलगी आहे आणि मला टीचर आय.एल्डरने बंदी बनवलं आहे. माझं नाव केली मॅक्कलम आहे आणि माझं वय 8 वर्ष आह. मिस आय. एल्डर आमच्याकडून कामं करून घेते आणि हे पत्र मी खाजगी स्वरूपात लिहित आहे. कृपया कुणी माझी मदत करा'. 

स्मिथने कसातरी या मुली म्हणजे केली मॅक्कलम, तिच्यासोबत दोन मुली लिंडा बेल आणि एन्ना ग्रीनहाल्घ यांना संपर्क केला. मोठ्या झालेल्या मुलींनी जेव्हा हा मेसेज वाचला तर आनंदाने उड्या मारू लागल्या. त्या म्हणाल्या की, बॉटलमध्ये असलेला मेसेज स्कूलमधील एक असायन्मेटचा भाग होता. तेव्हा त्यांना समुद्री डाकूंबाबत शिकवलं जात होतं. बेलने एसटीव्हीला सांगितलं की, भलेही 40 वर्ष लागली, पण हा मेसेज कुणाला तरी मिळाला. 

Web Title: Scottish students message in a bottle travels 6 miles in 40 years with a map in it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.