अद्भूत! आधी आपलं स्वत:चं डोकं कापतात, नंतर संपूर्ण नवं शरीर बनवतात हे विचित्र समुद्री जीव....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 03:21 PM2021-03-09T15:21:00+5:302021-03-09T15:25:02+5:30
अजूनही समजू शकलं नाही की, हे जीव असं का करतात? या प्रक्रियेला रीजनरेशन (Regeneration) म्हणतात. सामान्यपणे विना हाडांच्या जीवांमध्ये असं बघायला मिळतं.
एखादा जीव आपलं डोकं स्वत: कापेल आणि नवीन शरीर बनवेल, असं कदाचित एखाद्या सायन्स फिक्शन कथेत वाचलं किंवा पाहिलं असेल. पण आता खरंच असा एक जीव आढळून आला आहे. जपानच्या वैज्ञानिकांनी समुद्री जीव Sea Slug च्या दोन प्रजातींमध्ये ही विचित्र क्षमता शोधली आहे. हा जीव ३ आठवड्यात संपूर्ण शरीर पुन्हा वाढवतो. पण अजूनही समजू शकलं नाही की, हे जीव असं का करतात? या प्रक्रियेला रीजनरेशन (Regeneration) म्हणतात. सामान्यपणे विना हाडांच्या जीवांमध्ये असं बघायला मिळतं.
तीन आठवड्यात नवं शरीर
आतापर्यंतच्या थेअरीनुसार, आतल्या परजीवींना बाहेर काढण्यासाठी असं करत असावेत. मात्र, हे सिद्ध करण्यासाठी आधी रिसर्च करावं लागेल. शरीरापासून वेगळं झाल्यानंतर लगेच डोकं ठीक होऊ लागतं आणि काही वेळात ते कीटक खाऊ लागतं. एका आठवड्यात त्यांचं हृदय तयार होतं आणि तीन आठवड्यात त्यांचं पूर्ण शरीर. असं असलं तरी केवळ डोक्यापासूनच नवं शरीर तयार होतं आणि आधी वेगळं झालेल्या धडापासून डोकं तयार होत नाही.
नकळत लागला शोध
यूनिव्हर्सिटी ऑफ जपानचे प्रोफेसर योची यूसा आणि पीएचडी करत असलेले सायका मितोह यांनी नकळत याचा शोध लावला. यूसा लॅबमध्ये या स्लगच्या लाइफ सायकलचा अभ्यास करत होता. एक दिवस टीमने टॅंकमध्य विना शरीराचं डोकं फिरताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी रिसर्च सुरू केला. एका पातळ नायलॉनच्या ताराने त्याचे डोके कापण्यात आले. तर काही वेळाते ते पुन्हा ठीक होऊ लागले होते. त्यांनी हृदय आणि अवयवही विकसित केले. हे पाहून टीम हैराण झाली होती.
असं का करतात ते?
रिसर्चनुसार, स्लग्समध्ये डोकं कापण्याच्या जागी स्टेम सेल्ससारखे टिशू असतील जे असे सेल विकसित करत असतील ज्याची स्लगना गरज असले. यामुळे डोकं कापलं गेल्यानंतरही हृदय आणि शरीराचे दुसरे अवयवही पुन्हा तयार होतात. टीमने अंदाज लावला की, जोपर्यंत अवयव तयार होत नाही तोपर्यंत स्लग काई खाऊन जिवंत राहतात.