एका प्राण्याच्या विष्ठेपासून तयार केली जाते कॉफी, तिच आहे जगातली सर्वात महागडी कॉफी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 03:38 PM2022-10-18T15:38:24+5:302022-10-18T15:42:49+5:30
कॉफी कोपी लुवाकची टेस्ट घेण्यासाठी जगभरातील कॉफी आवडणारे लोक इंडोनेशियाला जातात. लोकांचं मत आहे की, ज्याने एकदा या कॉफीची टेस्ट घेतली त्या व्यक्ती जगातली दुसरी कोणतीच कॉफी पसंत पडणार नाही.
तुम्ही जर कॉफीचे शौकीन असाल तर ही माहिती तुम्हाला निराश करू शकते. कारण जगातली सर्वात महागडी मानली जाणारी कॉफी 'कोपी लुवाक' पिण्यासाठी फारच टेस्टी असते. पण ही कॉफी तयार करण्याची पद्धत मात्र फारच हैराण करणारी अशी आहे.
कॉफी कोपी लुवाकची टेस्ट घेण्यासाठी जगभरातील कॉफी आवडणारे लोक इंडोनेशियाला जातात. लोकांचं मत आहे की, ज्याने एकदा या कॉफीची टेस्ट घेतली त्या व्यक्ती जगातली दुसरी कोणतीच कॉफी पसंत पडणार नाही. प्रोसेसिंग आणि टेस्टनुसार या कॉफीची प्रति किलो किंमत २५ हजार रूपयांपासून सुरू होते. तर जास्तीत जास्त या कॉफीची किंमत २ लाख रूपये प्रति किलो असते. म्हणूनच या कॉफीला श्रीमंताची कॉफी म्हटलं जातं.
ही कॉफी जंगली रेड कॉफी बीन्सपासून तयार केली जाते. म्हणजे एशियन पाम सिवेट नावाच्या जनावराच्या विष्ठेपासून ही कॉफी तयार केली जाते. हा प्राणी झाडांवर राहतो. बोरं खाणारा हा प्राणी बोरं तर खातो, पण ते पचवू शकत नाही.
आता तुम्ही म्हणाल की, एशियन पाम सिवेटला बोरं पचत नसल्याचा आणि कॉफी तयार करण्याचा काय संबंध? तर हेच आश्चर्यकारक आहे. एशियन पाम सिवेट हा बोरं खातो पण त्याच्या बियांना पचवू शकत नाही. त्यामुळे या बीया त्याच्या विष्ठेतून बीन्सच्या रूपात बाहेर येतात. याच बियांपासून कोपी लुवाक कॉफी तयार केली जाते. ही एक फार दुर्मिळ कॉफी मानली जाते. त्यामुळे याची किंमतही फार जास्त आहे.
कोप लुवाक कॉफीच्या टेस्टची प्रोसेसिंग फारच वेगळी आहे. त्यामुळे या प्राण्याची विशेष काळजी घेतली जाते, त्यांना कॉफीच्या बिया खाण्यास दिल्या जातात. सकाळी सिवेटला नाश्त्यामध्ये मध आणि फिश दिली जाते. तसेच लंचमध्ये सफरचंद, केळी आणि गाजर दिले जातात. नंतर त्यांच्या विष्ठेतून बाहेर आलेल्या कॉफीच्या बीया भाजल्या जातात आणि त्यापासून कॉफी तयार केली जाते.