जवळपास 2 वर्षे लांब चालते हत्तीणीची प्रेग्नन्सी, जाणून घ्या यामागचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 04:20 PM2023-01-06T16:20:15+5:302023-01-06T16:22:26+5:30

Elephant Pregnancy : हत्तीणीच्या गर्भात तिचं पिल्लू हे जवळपास 2 वर्षे राहतं. हा एखाद्या प्राण्याचा बाळाचा आपल्या आईच्या पोटात राहण्याचा सर्वात मोठा कालावधी आहे.

Secret of long pregnancy of elephant reveal in research know the secret | जवळपास 2 वर्षे लांब चालते हत्तीणीची प्रेग्नन्सी, जाणून घ्या यामागचं रहस्य!

जवळपास 2 वर्षे लांब चालते हत्तीणीची प्रेग्नन्सी, जाणून घ्या यामागचं रहस्य!

Next

Elephant Pregnancy : हत्तींबाबत वेगवेगळी माहिती सोशल मीडियावर नेहमीच शेअर होत असते. अशीच एक आश्चर्यकारक माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हत्तीवर अभ्यास करणाऱ्यांनी एका रहस्यावरून पडदा उठवला आहे. वैज्ञानिकांनी हत्तीच्या लांब कालावधीच्या प्रेग्नन्सीचं रहस्य काही वर्षांपूर्वी उलगडलं होतं.

हत्तीणीच्या गर्भात तिचं पिल्लू हे जवळपास 2 वर्षे राहतं. हा एखाद्या प्राण्याचा बाळाचा आपल्या आईच्या पोटात राहण्याचा सर्वात मोठा कालावधी आहे. प्रिसीडिंग्स ऑफ द रॉयल सोसायटी बी मध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये वैज्ञानिकांना हत्तीणीच्या गर्भाबाबत महत्वाची माहिती मिळाली आहे.
वैज्ञानिकांना आशा आहे की, याने प्राणी संग्रहालयातील हत्तीणींच्या प्रजननासाठी फार मदत होईल. तसेच आफ्रिकेत हत्तींची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी गर्भनिरोधक उपायही केले जाऊ शकतील.

हत्ती हा फार बुद्धीमान प्राणी आहे. त्यांच्यात 68 दिवसांचा गर्भधारणेचा कालावधी असतो. आतापर्यंत हत्तीणीच्या इतक्या लांब गर्भावस्थेबाबत फारशी माहिती नव्हती. विकसित अल्ट्रासाउंड टेक्नॉलॉजीने व्हेटर्नरी वैज्ञानिकांना असे काही उपकरणे मिळाले आहेत ज्याने त्यांना हत्तीणीच्या गर्भावस्थेबाबत अधिक जाणून घेता आलं. 

हा रिसर्च ब्रिटन, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीच्या प्राणी संग्रहालयातील आफ्रिकेतील आणि आशियातील  17 हत्तीणींवर करण्यात आला. या रिसर्चमधून समोर आलं आहे की, हत्तींच्या अंडोत्सर्गाचं एक खास चक्र असतं. डॉ. ल्यूडर्स यांनी सांगितले की, हत्तीणीमध्ये जास्त काळ गर्भावस्था चालते याचं कारण हार्मोनची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कोणत्याही जनावराच्या प्रजातीत होत नाही. या रिसर्चने जंगलात आणि प्राणी संग्रहालयात राहणाऱ्या हत्तींना फायदा होईल.

वैज्ञानिकांनी सांगितले की, विषय केवळ इतकाच नाहीय की, हत्तीणींमध्ये 22 महिन्याचा गर्भावस्थेचा काळ फार जास्त असतो. त्याशिवाय दोन पिल्लांच्या जन्माचं अंतर देखील अधिक असतं. हे अंतर चार ते पाच वर्षाचं असतं. याने हत्तीच्या पिढीत फार अंतर येतं. 

हत्तींच्या काही प्रजाती जंगलाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांसाठी घातक असतात. कारण हे हत्ती घोळक्याने येतात आणि गाव उध्वस्त करून जातात. भारतात असं छत्तीसगढ आणि बंगालसारख्या काही भागांमध्ये होतं. तेच हत्तींच्या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. पण काही भागांमध्ये हत्तींच्या वाढत्या संख्येवर नियंत्रणाची मागणीही होत आहे. अशात हा रिसर्च या भागांमध्ये उपयोगी ठरू शकतो.

Web Title: Secret of long pregnancy of elephant reveal in research know the secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.