जगातल्या सर्वात खोल या स्वीमिंग पूलमध्ये केवळ पाणीच नसेल तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 05:11 PM2019-03-11T17:11:38+5:302019-03-11T17:17:22+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याला जवळ करण्याची वेळ आली आहे. अनेकजण याच दिवसात स्वीमिंग शिकण्याचा प्लॅन करत असतात.
उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याला जवळ करण्याची वेळ आली आहे. अनेकजण याच दिवसात स्वीमिंग शिकण्याचा प्लॅन करत असतात. तुम्हीही असाच काही प्लॅन करत असाल तर जगातल्या सर्वात खोल स्वीमिंग पूलमध्ये तुम्हाला शिकायला आवडेल का? सध्या एका स्वीमिंग पूलचा चर्चा रंगली असून हा स्वीमिंग पूल जगातला सर्वात खोल स्वीमिंग पूल असल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पूलमध्ये फक्त पाणीच नाही तर आणखीही खूपकाही असणार आहे.
या जगातल्या सर्वात खोल स्वीमिंग पूलची खोली ४५ मीटर म्हणजेच १४७.६ फूट असेल. लवकरचा हा स्वीमिंग पूल पोलॅंडच्या Mszczonow शहरातील सामान्य जनतेसाठी खुलं केलं जाणार आहे. या DeepSpot नावाच्या पूलमध्ये २७ नॉर्मल स्वीमिंग पूलच्या बरोबरीत पाणी भरलं जाईल.
रिपोर्टनुसार, हा पूल भरण्यासाठी साधारण ८ हजार घन मीटर पाण्याचा वापर होईल. तसेच स्वीमिंग पूलच्या आत सुरंग, हॉलेटच्या रूम्स, रेस्टॉरंट आणि कॉन्फरन्स रूम देखील असतील.
पोलॅंडच्या स्वीमिंग पूलला केवळ ६ महिनेच जगतला सर्वात खोल स्वीमिंग पूल असण्याचा किताब राहील. कारण ब्रिटनच्या Colchester ब्लू एबिस नावाचा एक पूल तयार होणार आहे. हा पूल ५० मीटर म्हणजेच १६४ फूट खोल असणार आहे.