लग्न ठरलं, मंडप सजला अन् ऐनवेळी गोंधळ झाला; नवरऱ्याचा हात पाहून नवरी जोरदार किंचाळली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 09:15 AM2021-12-15T09:15:58+5:302021-12-15T09:16:13+5:30
अद्यापही दोन्हीकडून कुठलाही तोडगा काढला जात नाही. पोलीस हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
अलीगड – उत्तर प्रदेशच्या अलीगड येथे हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका लग्नात नवरीनं मंडपातच नवऱ्याशी लग्न करण्यास नकार दिला. मुलीच्या या निर्णयामुळे खळबळ माजली. नेमकं काय घडलं? हे कुणालाही कळलं नाही. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी लग्न मोडलं तेव्हा दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमध्ये गोंधळ झाला. मग हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचलं.
माहितीनुसार, अद्यापही दोन्हीकडून कुठलाही तोडगा काढला जात नाही. पोलीस हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु दोघंही एकमेकांवर आरोप करत आहेत. नवरीने नवऱ्याकडच्या मंडळींवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. अलीगडच्या छर्रा परिसरातील सिरौली गावातील ही घटना आहे. लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मंडपात नवरदेवाचं स्वागत झालं. वऱ्हाडी मंडळींना जेवण केले. मंगलअष्टका झाल्या. हार घातले गेले. परंतु जेव्हा कन्यादानाच्या विधीसाठी नवऱ्याने हात पुढे केले तेव्हा नवरीने जोरदार किंचाळली. नवरीनं लग्नाचे विधी पूर्ण करण्यास नकार दिला.
नेमकं काय घडलं?
कन्यादानाचा विधी सुरू असताना नवरी आणि नवऱ्याने हात पुढे केले तेव्हा नवरीनं नवऱ्याच्या हाताची ३ बोटं तुटल्याचं पाहिलं. त्यामुळे नवरीने लग्नापासून नकार दिला. नवरीच्या या कृत्यामुळे लग्नात सुरू असलेला आनंदोत्सव बंद पडला. नवऱ्याने त्याच्या हाताची ३ बोटं तुटल्याची माहिती लपवल्याचा आरोप नवरीनं केला. नवऱ्याकडील मंडळींनी फसवणूक केली. तर नवऱ्याकडच्या मंडळींनी नवरीकडील लोकांवर आरोप करत दोन्ही मध्यस्थींना बंधक बनवल्याचा आरोप केला.
पोलीस करतायेत समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न
नवऱ्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की, आम्ही मुलाच्या हाताची ३ बोटं तुटल्याची माहिती दिली होती. त्यानंतरच लग्न ठरलं. लग्नाचे विधी जवळपास पूर्ण झाले. मात्र नवरीला निरोप देण्यास नकार देण्यात आला. या गोंधळानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले. सध्या नवरदेव वऱ्हाडासह नवरीच्या आगमनाची प्रतिक्षा करतोय. तर नवरी तिच्या नवऱ्यासोबत जाण्यास तयार नाही. त्यामुळे या अजब घटनेत पोलीस समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापही दोन्ही बाजूची मंडळी काहीही ऐकण्यास तयार नाही.