सीमा हैदरच्या पाकिस्तानी मैत्रीणीचा दावा, म्हणाली - ती ड्रामा करत आहे, दगाबाज आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 09:29 AM2023-07-15T09:29:23+5:302023-07-15T09:29:40+5:30
Seema Haider Story : पाकिस्तानी महिला सीमा हैदरवर वेगवेगळे आरोपही होत आहेत. स्वत:ला सीमाची बालपणीची मैत्रीण सांगणाऱ्या एका पाकिस्तानी तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Seema Haider Story : आपल्या चार मुलांना घेऊन पाकिस्तानातून भारतात आलेल्लाय सीमा हैदरच लव्हस्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या ती तिचा प्रियकर सचिनसोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. सीमाला बघण्यासाठी सचिनच्या घरासमोर गर्दी होत आहे. अशात तिच्यावर वेगवेगळे आरोपही होत आहेत. स्वत:ला सीमाची बालपणीची मैत्रीण सांगणाऱ्या एका पाकिस्तानी तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या तरूणीने सांगितलं की, ती सीमाला बालपणापासून ओळखते. तिच्यावर राग व्यक्त करत ती म्हणाली की, मी तिला चांगलीच ओळखते. तरूणीचा आरोप आहे की, सीमा दगाबाज आणि खोटारडी आहे. ती हिंदू आणि पाकिस्तानसोबत दगा करत आहे तरूणी इतक्यावर थांबली नाही तर पुढे म्हणाली की, सीमा इस्लाम सोडून हिंदू बनली. येणाऱ्या दिवसात ती ख्रिश्चनही बनू शकते.
तरूणीने असाही दावा केला की, सीमा खोटारडी आहे. तिचे अनेक पुरूष मित्र आहेत. ती सगळ्यांसोबतच असं करते. तरूणीच्या आरोपांची यादी इथेच संपली नाही. ती म्हणाली की, सीमा ड्रामा करत आहे. सीमा भारतात जाऊन क्रिकेट मॅच बघण्याबाबत बोलली होती. आता भारतात जाऊन तिने ड्रामा सुरू केला.
तरूणीने सीमाचा प्रियकर सचिनलाही सल्ला दिला आहे की, त्याने तिच्यापासून वाचून रहावं. ती फार मोठी दगाबाज आहे. तुझ्या परिवाराला दगा येईल. याआधी एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात एका तरूणाने स्वत:ला सीमाचा एक्स बॉयफ्रेंड सांगितलं होतं.
या तरूणाने दावा केला होता की, सीमाने सचिनला पबजीवर कॉन्टॅक्ट केला होता. दोघांमध्ये बोलणं होत होतं. सीमा सगळंकाही सोडून त्याच्याकडे येण्यास तयार झाली. सीमाला क्रिकेटची खूप आवड आहे. तिला वर्ल्ड कप 2023 मॅच बघायच्या होत्या. यासाठी ती भारतात गेली आहे.
पाकिस्तानी तरूणीने व्हिडिओत सांगितलं की, वर्ल्ड कप मॅच पासून सीमा पाकिस्तानात परत येईल. दुसरीकडे भारतात आलेली सीमा स्वत:ची ओळख सीमा सचिन अशी सांगते. असं सांगण्यात आलं आहे की, दोघांची लव्हस्टोरी पजबी गेम खेळताना सुरू झाली होती. दोघांनी भेटण्याचं ठरवलं आणि सीमा आपल्या चार मुलांना घेऊन नेपाळच्या मार्गे भारतात आली.
सीमाने दावा केला होता की, 'आम्ही 10 मार्चला पहिल्यांदा भेटलो. रात्रीचे 9 किंवा 10 वाजले असतील. आम्ही नेपाळमध्येच 13 मार्चला लग्न केलं. फार मोठं मंदिर होतं. ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो तिथून साधारण 10 मिनिटांवर मंदिर होतं. तिथेच आम्ही लग्न केलं'.