प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेन्डला इंग्रजीत फेल होण्याची होती भीती, बॉयफ्रेन्ड मुलगी बनून तिचा पेपर द्यायला गेला आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:56 PM2021-08-17T12:56:42+5:302021-08-17T13:03:13+5:30
२२ वर्षीय खादिमने हाय स्कूल ग्रॅज्युएशनच्या परीक्षेत आपल्या १९ वर्षीय प्रेयसी गॅंग्यू डिओमची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या जागी स्वत: परीक्षा देण्यासाठी गेला.
इंग्रजी बोलण्यात आणि लिहिण्यात आजही अनेकांना घाम फुटतो. भल्याभल्यांची ही अग्नी परीक्षाच असते. पश्चिम आफ्रिकेत सेनेगल देश आहे. इथे गॅस्टन बर्जर डी सेंट लुई यूनिव्हर्सिटीमध्ये एका तरूणाला परीक्षा देताना अटक करण्यात आली आहे. कारण तो तरूणीच्या वेशात आपल्या गर्लफ्रेन्डसाठी पेपर सोडवत होता. जेणेकरून ती फेल होऊ नये.
२२ वर्षीय खादिमने हायस्कूल ग्रॅज्युएशनच्या परीक्षेत आपल्या १९ वर्षीय प्रेयसी गॅंग्यू डिओमची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या जागी स्वत: परीक्षा देण्यासाठी गेला. कुणीही त्याला ओळखू नये म्हणून तो तरूणीच्या वेषात गेला.
मुलगीसारखा दिसावा म्हणून त्याने ट्रेडिशनल स्कार्फ, कानातले आणि मुलींचा ड्रेश परिधान केला. त्यासोबत त्याने पूर्ण मेकअप केलं. इतकंच नाही तर मुलींची ब्रा सुद्धा त्याने घातली. याच कारणाने तो तीन दिवस परीक्षेच्या हॉलमध्ये एक्झामिनर्सना चकवा देऊ शकला. सगळं काही ठीक सुरू होतं. पण चौथ्या दिवशी एका सुपरवायजरला खादिमवर संशय आला. जेव्हा त्याची चेकिंग केली गेली तेव्हा त्याचा भांडाफोड झाला.
३१ जुलैला सेंटरवर पोलिसांना बोलवण्यात आलं आणि खादिमवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खादिमच्या मदतीनेच पोलीस त्याच्या गर्लफ्रेन्डपर्यंत पोहोचले. ती एका हॉटेलमध्ये त्याची वाट बघत होती. खादिमचं तिच्यावर इतकं प्रेम की त्याने तिच्यावर संकट येऊ दिलं नाही. त्याने सर्व गुन्हा स्वत:वर घेतला.
तो पोलिसांना म्हणाला की, हे सगळं मी प्रेमासाठी केलं. कारण माझ्या गर्लफ्रेन्ड इंग्रजी विषयात फेल होण्याची भीती होती. पण पोलिसांनी त्याचं काही ऐकलं नाही. दोघांविरोधात फ्रॉ़डचा गुन्हा दाखल केला. जर दोघांना शिक्षा झाली तर ते देशात कोणत्याही प्रकारची परीक्षा ५ वर्षे देऊ शकणार नाहीत. तसेच डिप्लोमा डिग्रीही घेऊ शकणार नाही. त्यासोबतच त्यांना आर्थिक दंडही भरावा लागू शकतो. इतकंच नाही तर त्यांना ५ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षाही होऊ शकते.