‘सुपर गर्ल’ सेरेनाने मोबाईल चोराला पकडले

By admin | Published: November 6, 2015 02:38 AM2015-11-06T02:38:33+5:302015-11-06T02:38:33+5:30

जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्स सर्वसाधारणपणे कोर्टवर राहिल्यास प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या मनात धडकी भरते, असे चित्र नेहमीच दिसते

Serena seized a mobile peal of 'Super Girl' | ‘सुपर गर्ल’ सेरेनाने मोबाईल चोराला पकडले

‘सुपर गर्ल’ सेरेनाने मोबाईल चोराला पकडले

Next

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्स सर्वसाधारणपणे कोर्टवर राहिल्यास प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या मनात धडकी भरते, असे चित्र नेहमीच दिसते; परंतु सेरेनाने कोर्टबाहेर पराक्रम केला आणि स्वत:ची तुलना ती ‘सुपर गर्ल’शी करू लागली आहे.
२१ वर्षीय ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेनाबरोबर मंगळवारी एक विचित्र घटना घडली. सेरेना तिच्या मित्रांसह एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तेथे तिच्यासमोर अचानक एक व्यक्ती येऊन तिचा मोबाईल फोन घेऊन धावली. तेव्हा सेरेना खुर्च्यांवरून झेप घेत, ती चोराच्या मागे धावली आणि त्याला पकडताना आपला मोबाईल फोन घेतला.
या घटनेचे सेरेनाने फेसबुक अकाउंटवर वर्णन केले आहे आणि स्वत:ला ‘सुपर हिरो’च्या जागी ‘सुपर सेरेना’ असे म्हटले आहे. सेरेनाने फेसबुकवर लिहिले, ‘मंगळवारी एका रेस्टॉरंटमध्ये चायनीज अन्नाचा स्वाद घेत असतानाच एका व्यक्तीने टेबलवर ठेवलेला माझा मोबाईल घेतला आणि तो धावत सुटला. त्यानंतर मी खुर्चीवरून झेप घेत, रेस्टॉरंटच्या बाहेर आली आणि त्या चोराचा पाठलाग करताना त्याला पकडले. माझ्यापेक्षा जास्त वेगाने धावून निघून जाऊ, असा चोराने विचार केला असेल; परंतु सरावादरम्यान लावलेल्या स्प्रिंट्स उपयोगात आल्या. मी वेगाने धावत त्याला थोड्या अंतरावरच पकडले. जेव्हा मी पुन्हा रेस्टॉरंटमध्ये परतले, तेव्हा उपस्थितांनी उभे राहून माझे स्वागत केले आणि माझा उत्साह वाढवला. मला याचा अभिमान आहे. जे अन्य लोक करू शकले असते तेच मी करून दाखवले. हा महिलेसाठी विजय आहे.’

Web Title: Serena seized a mobile peal of 'Super Girl'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.