हजारो वर्ष जुना दगड दोन भागात विभागल्याने जपानी लोक चिंतेत, पण त्यात इतकं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 11:47 AM2022-03-08T11:47:02+5:302022-03-08T11:47:42+5:30
Sessho-seki aka The Killing Stone : एक प्राचीन जपानी शिलाखंडात हजारो वर्षाआधी एक 'राक्षस' कैद असल्याचा दावा केला जात होता. आता तो दगड रहस्यमयरित्या दोन भागात विभागला गेला आहे.
Sessho-seki aka The Killing Stone : आपण अनेकदा कथांमध्ये ऐकत असतो की, हजारो वर्षांआधी पृथ्वीवर राक्षस होते. पण आजच्या काळात यावर कुणीही विश्वास ठेवत नाहीत. मात्र, पौराणिक कथांमध्ये अशा गोष्टी नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना जपानमधून समोर आली आहे. एक प्राचीन जपानी शिलाखंडात हजारो वर्षाआधी एक 'राक्षस' कैद असल्याचा दावा केला जात होता. आता तो दगड रहस्यमयरित्या दोन भागात विभागला गेला आहे. असं सांगितलं जातं की, काही वाईट शक्तींमुळे असं झालं.
'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, सेशो-सेकी उर्फ द किलिंग स्टोन (Sessho-seki aka The Killing Stone) एक ज्वालामुखी दगड आहे. असं मानलं जातं की, या दगडात एक वाईट आत्मा आहे आणि सेंट्रल जपानमध्ये एका सक्रिय ज्वालामुखीवर बसते. हे ठिकाण टोकियापासून जास्त दूर नाही. जपानी पौराणिक कथांनुसार, असं मानलं जातं की, या दगडात एक वाईट आत्मा राहते आणि इतकंच नाही तर ही आत्मा इतकी शक्तीशाली आहे की, याच्या संपर्कात जो कुणी येईल त्याचा जीव जातो.
५ मार्चला हा दगड दोन भागात विभागला गेला. त्यानंतर जपानी स्थानिक लोक आणि ऑनलाइन यूजर्सने यावर चिंता व्यक्त केली की, दगडातून सतत विषारी गॅस निघत आहे. असं म्हटलं जातं की, किलिंग स्टोनमध्ये तमामो-नो-माई (Tamamo-no-Mae) चा मृतदेह होता. जी एका सुंदर महिलेच्या रूपात दिसत होती. पण नंतर नऊ शेपट्या असलेल्या कोल्ह्याच्या रूपात समोर आली.
ज्वालामुखीतील दगडाने लोकांना केलं हैराण
जपानी पौराणिक कथांनुसार, तमामो-नो-माई एक शक्तीशाली जपानी सामंती प्रभूसाठी काम करत होता. जो ११०० च्या दशकात सम्राट टोबाला मारण्याचा प्लान करत होता. दगड तुटल्याची बातमी समोर येताच लोकांनी चिंता व्यक्ती केली आणि सिद्धांत समोर आणण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. एका व्यक्तीने लिहिलं की, 'हे फारच भीतीदायक आहे, आपल्याला आणखी अंधाराची गरज नाही'.