वाढदिवशी पार्कमध्ये आली होती 7 वर्षीय मुलगी, सापडलं असं काही लखपती बनून गेली!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 03:06 PM2023-09-09T15:06:06+5:302023-09-09T15:06:27+5:30

पॅरागोल्ड इथे राहणारी मुलगी एस्पेन ब्राऊनला पार्कमध्ये परिवारासोबत आपला वाढदिवस साजरा करताना हिरा सापडला.

Seven year old girl found 295 carat diamond in park while celebrating birthday in US | वाढदिवशी पार्कमध्ये आली होती 7 वर्षीय मुलगी, सापडलं असं काही लखपती बनून गेली!

वाढदिवशी पार्कमध्ये आली होती 7 वर्षीय मुलगी, सापडलं असं काही लखपती बनून गेली!

googlenewsNext

अमेरिकेच्या अर्कांससमधील क्रेटर ऑफ डायमंड्स स्टेट पार्कमध्ये एका 7 वर्षीय मुलीला असं काही सापडलं. ज्याचं स्वप्नं मोठमोठे लोक बघतात. ती तिच्या वाढदिवसाला इथे फिरण्यासाठी आली होती. तेव्हाच तिल 2.95 कॅरेटचा हिरा सापडला. अर्कांससम स्टेट पार्कनुसार, पॅरागोल्ड इथे राहणारी मुलगी एस्पेन ब्राऊनला पार्कमध्ये परिवारासोबत आपला वाढदिवस साजरा करताना हिरा सापडला.

पार्कमध्ये सापडलेल्या हिऱ्याबाबत या इन्स्टावर सांगण्यात आलं आहे.  अर्कांससम स्टेट पार्कने लिहिलं की, पॅरागोल्डची राहणारी 7 वर्षीय एस्पेन ब्राऊन 1 सप्टेंबरला मर्फीरीसबोरोमध्ये क्रेटर ऑफ डायमंड्स स्टेट पार्कमध्ये आली होती आणि एस्पेन तिथून 2.95 कॅरेटचा हिरा घेऊन गेली. हा या पार्कमध्ये यावर्षी एखाद्या व्यक्तीला सापडलेला दुसरा सगळ्यात मोठा हिरा आहे. याआधी मार्चमध्ये 3.29 कॅरेटचा ब्राऊन हिरा सापडला होता.

ही पोस्ट दोन दिवसांआधी शेअर करण्यात आली होती. ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'वाह, फारच सुंदर'. दुसऱ्याने लिहिलं की, 'एस्पेन खूप शुभेच्छा, फारच चांगला शोध लावला'. 

या पोस्टमध्ये हिऱ्याचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. ज्यात तो फारच सुंदर दिसत आहे. दूरून तो एखाद्या प्लास्टिकसारखा दिसतो. पण तो एक हिरा आहे. या पार्कमध्ये लोक दुरदरून हिरे शोधण्यासाठी येतात. पण फार कमी लोकांनी हिरे सापडतात. एस्पीन नशीबवान ठरली.

Web Title: Seven year old girl found 295 carat diamond in park while celebrating birthday in US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.