बाहुबली समोसा खाऊन मिळवा 71 हजार रूपये बक्षीस, पण आहे एक अट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 09:57 AM2023-06-19T09:57:35+5:302023-06-19T09:59:20+5:30

Bahubali Samosa : लालकुर्ती स्थित कौशल स्वीट्सच्या तिसऱ्या पीढीचे मालक शुभम कौशल यांनी सांगितलं की, त्यांना समोस्याला लोकांमध्ये आकर्षणाचं केंद्र बनवण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं.

Seventy one thousand prize on eating Bahubali samosa of Meerut | बाहुबली समोसा खाऊन मिळवा 71 हजार रूपये बक्षीस, पण आहे एक अट!

बाहुबली समोसा खाऊन मिळवा 71 हजार रूपये बक्षीस, पण आहे एक अट!

googlenewsNext

Bahubali Samosa :  सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पदार्थांची चांगलीच चर्चा होत असते. अशात आता सोशल मीडियावर मेरठमधील बाहुबली समोसा फेमस झाला आहे. तुम्ही म्हणाल यात काय विशेष. तर हा समोसा तब्बल 12 किलोचा आहे. महत्वाची बाब म्हणजे हा समोसा तुम्ही 30 मिनिटांमध्ये खाल्ला तर तुम्हाला 71 हजार रूपये बक्षीस मिळेल. हा समोसा खाल्ल्यावर 71 हजार रूपये तर मिळतील, पण याला खाणं सगळ्यांना जमणार नाही. 

लालकुर्ती स्थित कौशल स्वीट्सच्या तिसऱ्या पीढीचे मालक शुभम कौशल यांनी सांगितलं की, त्यांना समोस्याला लोकांमध्ये आकर्षणाचं केंद्र बनवण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. 12 किलोचा बाहुबली समोसा तयार करण्याचा विचार यातूनच आला. 

दुकानदार शुभम कौशल म्हणाले की, लोकांमध्ये बाहुबली समोस्याची इतकी क्रेझ आहे की, ते आपल्या वाढदिवसाला पारंपारिक केकऐवजी बाहुबली समोसा कापणं पसंत करतात. शुभम म्हणाले की, 30 मिनिटात हा समोर खाल्ल्यावर 71 हजार रूपये बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान हा बाहुबली समोसा तयार करण्यासाठी कारगिरांना साधारण 6 तासाचा वेळ लागतो. शुभम कौशल यांनी सांगितलं की, समोसा कढईत तळण्यासाठीच दीड तासांचा वेळ लागतो. तर तीन लोक मिळून हा समोसा बनवतात.

दुकानदार म्हणाले की, आमच्या दुकानातील बाहुबली समोस्याने फूड ब्लॉगर आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंसर यांचं ही लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणाले की, या बाहुबली समोस्यासाठी आधी बुकिंग करावी लागते. 12 किलो वजनाच्या या समोस्याची किंमत 1 हजार 500 रूपये आहे.

Web Title: Seventy one thousand prize on eating Bahubali samosa of Meerut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.