हनीमूनसाठी गेलेल्या नवरीचा वेदनादायी मृत्यू, समोर असूनही वाचवू शकला नाही पती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:28 PM2023-12-08T12:28:56+5:302023-12-08T12:29:28+5:30

नुकतीच बहामासध्ये वॉटर स्पोर्ट्सदरम्यान एक भयंकर दुर्घटना घडली. इथे एका शार्कने हनीमूनसाठी आलेल्या नव्या नवरीचा जीव घेतला.

Shark attack newlywed woman death in honeymoon paddle board floats away | हनीमूनसाठी गेलेल्या नवरीचा वेदनादायी मृत्यू, समोर असूनही वाचवू शकला नाही पती

हनीमूनसाठी गेलेल्या नवरीचा वेदनादायी मृत्यू, समोर असूनही वाचवू शकला नाही पती

जगातील अनेक लोकांना अॅडव्हेंचरची खूप आवड असते. पण हेच अॅडव्हेंचर अनेकदा जीवघेणं ठरतं. बंजी जंपिंगपासून ते स्काय डायविंगपर्यंत सगळे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स रिस्की असतात. तेच वॉटर स्पोर्ट्सबाबत सांगायचं तर यात पाण्यातील खतरनाक जीवांच्या हल्ल्याची भीती असते.

नुकतीच बहामासध्ये वॉटर स्पोर्ट्सदरम्यान एक भयंकर दुर्घटना घडली. इथे एका शार्कने हनीमूनसाठी आलेल्या नव्या नवरीचा जीव घेतला. ही महिला तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बहामासच्या सॅंडल्स रिसॉर्टपासून थोड्या अंतरावर पॅडलबोर्डिंग करत होती. तेव्हाच एका शार्कने तिच्यावर हल्ला केला.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, हल्ल्यावेळी महिलेचा पतीही सोबत होता. पॅडलबोर्ड चालवत असताना पाण्यातून अचानक एका शार्कने तिच्यावर हल्ला केला. व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये दिसत आहे की, जेव्हा महिलेवर हल्ला झाला तेव्हा लाइफ गार्ड महिलेकडे धावत गेले आणि रक्ताने माखलेल्या महिलेला किनाऱ्यावर घेऊन आले. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

पोलिसांनी मीडियाला सांगितलं की, सकाळी 11.15 वाजता पोलिसांना माहिती मिळाली की, यूएसच्या एका महिला टुरिस्टवर शार्कने हल्ला केला. आमच्या प्राथमिक रिपोर्टनुसार, महिला वेस्टर्न न्यू प्रोविडेंसमध्ये एका रिसॉर्टच्या मागे पतीसोबत पॅडलबोर्डिंग करत होती. तेव्हाच तिच्यावर हल्ला झाला.

हल्ल्यानंतर ड्यूटीवर असलेल्या लाइफगार्डने तिला सुरक्षित ठिकाणी आणलं आणि जखमी महिलेला लगेच सीपीआर दिला. तिच्या शरीरावर उजव्या बाजूला गंभीर जखमा होत्या. उपचारादरम्यान महिलेला मृत घोषित करण्यात आलं.

एक जेट स्की ऑपरेटरने नासाउ गार्जियनला सांगितलं की, त्याने किनाऱ्यावरून हा हल्ला पाहिला. ते दृश्य फार घाबरवणारं होतं. कारण काही वेळाआधीच मी त्यांना हसत-खेळत बघितलं होतं. पण त्यानंतर काही वेळातच पॅडलबोर्डवर तरूण होता आणि महिला हल्ल्यामुळे पाण्यात पडली होती.

Web Title: Shark attack newlywed woman death in honeymoon paddle board floats away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.