सेल्फीच्या वेडामुळे ती सध्या भोगतेय शिक्षा
By admin | Published: March 28, 2017 01:34 AM2017-03-28T01:34:29+5:302017-03-28T01:34:51+5:30
मॅन्चेस्टरमध्ये राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेला तिचं सेल्फीचं वेड थेट तुरुंगातच घेऊ न गेलं. पॅरिस कोनोली
मॅन्चेस्टरमध्ये राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेला तिचं सेल्फीचं वेड थेट तुरुंगातच घेऊ न गेलं. पॅरिस कोनोली या महिलेने स्वत:ची एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि तो फोेटो तिच्यासाठी अडचणीचा ठरला. त्या फोटोमध्ये तिच्या बेडरूममध्ये गांजाचं रोप दिसत होते. ते पाहून एकानं थेट पोलिसांकडे तक्रार केली. मग काय, पोलिसांनीही तो फोटा बारकाईनं पाहिला आणि नंतर त्यांनी तिच्या घरावर छापाच घातला.
त्या छाप्यामध्ये तिच्या घरी एक नव्हे, तर गांजाची तब्बल १६ रोपं असल्याचं पोलिसांना आढळलं. एवढंच नव्हे, तर अन्य अमली पदार्थांची पाकिटंही तिच्या घरात सापडली. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केलं. मग न्यायालयानंही तिला शिक्षा सुनावली. ती शिक्षा आहे पुढील १६ महिने तिनं एकही पैसा न घेता समाजिक काम करायची. हे काम तिथं १८0 तास करायचं आहे. ही पॅरिस स्वत: किम कर्दाशियन समजते. किम कर्दाशियन ही अमेरिकन मॉडेल, उद्योजक आणि टीव्हीवरील सेलिब्रेटी आहे. पॅरिसला फोटो शूट आणि सेल्फीचं भलतंच वेड असून, ती सतत सोशल मीडियावर स्वत:चे फोटो टाकत असते.