ती जन्मलेली बिना गर्भाशयाची पण तिने दिला बाळाला जन्म, वाचून तुम्हीही व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 07:44 PM2021-06-24T19:44:17+5:302021-06-24T19:44:56+5:30
आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत जी वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ३२ वर्षाची अमांडा ग्रुनेल हीला गर्भाशय नव्हते पण तिने एका गोंडस आणि स्वच्छ बाळाला जन्म दिला. हे असंभव फक्त डॉक्टरांच्या मेहनतीमुळे शक्य झाले.
आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत जी वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ३२ वर्षाची अमांडा ग्रुनेल हीला गर्भाशय नव्हते पण तिने एका गोंडस आणि स्वस्थ बाळाला जन्म दिला. हे असंभव फक्त डॉक्टरांच्या मेहनतीमुळे शक्य झाले.
१७ वर्षाच्या अमांडाला मासिक पाळी येत नव्हते. याबद्दल चाचणी करण्यासाठी ती डॉक्टरकडे गेली असता तिला समजले की तिला गर्भाशय नाही. ती गर्भाशयाविना जन्माला आली होती. प्रत्येक महिलेमध्ये गर्भाशय असते जे प्रजननाचे कार्य करते. अमांडा गर्भाशयाविना जन्मल्याने तीच्यासाठी आई होणं अशक्य होतं. अखेरीस डॉक्टरांच्या परिश्रमामुळे ती गर्भवती झाली. डॉक्टरांनी तिच्या शरीरात शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय ट्रान्सप्लांट केले. त्यानंतर ३२ वर्षीय अमांडाने मुलीला जन्म दिला.
अमांडाने इनसाईड एडिशनशी बोलताना सांगितले की मी १६ वर्षाची झाले तरी मला पाळी येत नव्हती. मलाही असं वाटत होत की, काहीतरी गडबड आहे. मी १७ वर्षाची झाले तेव्हा डॉक्टरकडे गेले आणि मी विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की मला गर्भाशय नाही आणि मी कधीही आई होऊ शकत नाही. मात्र गर्भाशयाच्या ट्रान्सप्लांटमुळे मी आई झाले याचा मला आनंद आहे."