मेंढपाळाला मिळाला एक कोटीचा दगड, पण झाला नाही कोट्याधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 07:04 PM2021-05-17T19:04:45+5:302021-05-17T19:06:34+5:30

इग्लंडमधील एका मेंढपाळाला दगड मिळाला. तोही तब्बल १ कोटींचा. काय केलं नेमकं त्याने या दगडासोबत?

Shepherd found Stone worth of 1 crore rupees; but donated it | मेंढपाळाला मिळाला एक कोटीचा दगड, पण झाला नाही कोट्याधीश

मेंढपाळाला मिळाला एक कोटीचा दगड, पण झाला नाही कोट्याधीश

Next

नशीबाची कृपा झाली की काय काय नाही घडू शकत. तुम्हाला लहानपणीची लाकुडतोड्याची गोष्ट आठवते का? त्याची कुऱ्हाड पाण्यात पडल्यानंतर देवी त्याला सोन्याची, चांदीची कुऱ्हाड देऊ इच्छिते मात्र तो लाकडाचीच कुऱ्हाड घेतो. अशीच काहीशी घटना युकेमधील कॉटस्वोल्ड भागातील मेंढपाळासोबत घडली आहे. आपल्या मेंढ्या चरायला घेऊन गेला असताना. त्याच्यासोबत अशी काही गोष्ट घडली की म्हटलं तर तो रातोरात करोडपती होऊ शकला असता. पण तसं झालं नाही. त्यानेच हे होऊ दिलं नाही. का बरं? वाचा पुढे...


तर त्याचं असं झालं की हा मेंढपाळ नेहमीप्रमाणे रानात त्याच्या मेंढ्या चरायला घेऊन गेला. तोच त्याला जमिनीवर काहीतरी जोरदार आदळल्याचा आवाज आला. काय आदळले म्हणून तो पहावयास गेला तर १०३ किलोचा दगड त्याला पडलेला दिसला. याची माहिती मिळताच चार-पाच वैज्ञानिकांचा समुह त्याच्या घरी त्याला भेटायला गेला. तो दगड नीट तपासून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले हा दगड साधासुधा नव्हता तर या दगडाची किंमत तब्बल १ करोडच्या आसपास होती. तुम्ही हे वाचून जसे अवाक् झालात त्यापेक्षा तो मेंढपाळ आश्चर्यचकित झाला. आ वासून वैज्ञानिकांकडे पाहु लागला. त्याला कधी स्वप्नातही वाटलं नसेल की तो करोडपती होईल.

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की एका दगडाची किंमत १ करोड कशी असेल? पण तो दगड होता उल्कापाताचा तुकडा. जो चार अब्ज (बिलियन) वर्षापूर्वीपासून आवकाशात तरंगत होता. या दगडावर संशोधन केल्यानंतर अवकाशातील अत्यंत महत्वाच्या माहितीचा उलगडा होणार होता. अवकाशाशी संबधित आणि पृथ्वीवरील माणसांशी निगडीत अनेक गुपिते या दगडामुळे उलगडली जाणार होती.
या दगडाचे नाव ‘Winchcombe meteorite’असे ठेवण्यात आले. याबदल्यात वैज्ञानिकांनी त्याला १ करोड रुपये देऊ केले. पण मेंढपाळ वर सांगितलेल्या लाकुडतोड्याच्या गोष्टीतील लाकुडतोड्याप्रमाणे प्रामाणिक होता. त्याने क्षणाचाही अवधी न लावता हा दगड दान देऊन टाकला. संशोधकांनी त्याला देऊ केलेले एक करोड रुपयेही त्याने घेतले नाही.


हा दगड एखाद्या ज्वलंत  उल्केप्रमाणे कोसळत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. असा दगड यापूर्वी कधीही पृथ्वीवर सापडला नव्हता. तसेच अत्यंत दुर्लभ आणि महत्त्वाचा हा दगड आहे.

Web Title: Shepherd found Stone worth of 1 crore rupees; but donated it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.