गायीनं दिला २ डोकी असलेल्या वासराला जन्म; पाहून डॉक्टरांसह सारेच चकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 03:57 PM2021-12-20T15:57:54+5:302021-12-20T16:02:46+5:30
दोन डोक्यांचं वासरू पाहून सारेच चक्रावले; खाता पिताना होतेय वासराला अडचण
ब्राझीलमध्ये एका गायीनं दोन डोकी असलेल्या वासराला जन्म दिला आहे. या वासराला पाहून सारेच चकीत झाले. १३ डिसेंबरला नोवा वेनेसियामध्ये वासरू जन्माला आलं. दोन डोकी असल्यानं वासराला उभं राहताना अडचणी येत आहेत. त्याना खातानाही समस्यांचा सामना करावा लागत आहे.
डेल्सी बुसाटो यांच्या गायीनं दोन तोंडाच्या वासराला जन्म दिला. वासराला उभं राहताना अडचणी येत आहेत. त्यामुळे त्याला त्याच्या आईचं दूध पिता येत नाही. वासराला सध्या बाटलीतून दूध पाजण्यात येत आहे. 'आमची गाय ६ वर्षांची आहे. याआधी तिनं दोन वासरांना जन्म दिला आहे. त्या दोघांची शारीरिक स्थिती सामान्य आहे. मात्र तिसरं वासरू पाहून आम्ही चकीत झालो. आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच दोन डोक्यांचं वासरू पाहिलं,' असं बुसाटो यांनी सांगितलं.
जेनोममध्ये होत असलेल्या बदलांमुळे असे प्रकार घडतात. कधी कधी क्रॉसब्रिडिंगमुळेदेखील असे प्रकार होतात. गेल्या महिन्यात तुर्कस्तानातल्या बहसीरसीमध्ये असाच एक प्रकार घडला होता. तिथेही एका गायीनं दोन डोकी असलेल्या वासराला जन्म दिला होता. त्याला ६ पाय आणि दोन शेपट्या होत्या.