धक्कादायक! चित्रपटात पाहिलेलं सत्यात घडलं, महिलेला अजगराने जिवंत गिळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 03:22 PM2022-10-26T15:22:36+5:302022-10-26T15:24:17+5:30

लोकांनी अजगराचे पोट फाडून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. पाहा फोटो...

Shocking! 22 feet long python swallows woman alive | धक्कादायक! चित्रपटात पाहिलेलं सत्यात घडलं, महिलेला अजगराने जिवंत गिळलं

धक्कादायक! चित्रपटात पाहिलेलं सत्यात घडलं, महिलेला अजगराने जिवंत गिळलं

googlenewsNext


अॅनाकोंडा किंवा मोठ्या आकाराच्या अजगराने माणसाला गिळल्याचे तुम्ही चित्रपटात पाहिले असेल. अशाच प्रकारची धक्कादायक घटना सत्यात घडली आहे. एका महाकाय अजगराने 54 वर्षीय महिलेला जिवंत गिळले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजगराला मारुन, महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शुक्रवारी महिला रबर घेण्यासाठी जंगलात गेली होती. दोन दिवसांनी महिलेला गिळलेला अजगर स्थानिक लोकांना सापडला.

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, ही आश्चर्यकारक आणि धक्कादायक घटना जाम्बी प्रांतात (इंडोनेशिया) घडली आहे. 54 वर्षीय जाराह शुक्रवारी रात्री जंगलातून अचानक बेपत्ता झाली. ती बेपत्ता झाल्यानंतर स्थानिकांनी तिचा शोध सुरू केला. दोन दिवसांच्या धडपडीनंतर या लोकांना जंगलात एक पोट फुगलेला अजगर सापडला. लोकांनी अजगराला ठार मारले आणि त्याचे पोट फाडून महिलेचा मृतदेह बाहेर काढला.


अशा महाकाय अजगरांना शिकार गिळण्यासाठी किंवा पचवण्यासाठी कित्येक आठवडे लागतात. पण या अजगराने जाराहच्या शरीराचा बराचसा भाग गिळला होता. अजगराचे पोट फाडल्यानंतर, ही बाब समोर आली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आता महिलेच्या  मृत्यूनंतर स्थानिक लोक घाबरले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात लोकांना अनेक साप दिसले आहेत. यापूर्वी 27 फुटांचा अजगरही स्थानिक नागरिकांनी पकडला होता. यापूर्वी दोन शेळ्याही अजगराने गिळल्या होत्या. विशेष म्हणजे, इंडोनेशियामध्ये लांब आकाराचे अजगर मोठ्या प्रमाणात आढळतात. हे अजगर जंगलात आढळतात आणि मुख्यतः प्राण्यांना लक्ष्य करतात. यापूर्वी 2017 मध्ये अकबर सलुबिरो नावाच्या व्यक्तीचा मृतदेहही अजगराचे पोट फाडून बाहेर काढला होता. 

Web Title: Shocking! 22 feet long python swallows woman alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.