#Shocking : स्वत:च्याच लग्नात नाचता नाचता तिनं दिला बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 14:54 IST2018-01-03T14:41:51+5:302018-01-03T14:54:25+5:30
आपल्याच लग्नात वधुने बाळाला जन्म दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

#Shocking : स्वत:च्याच लग्नात नाचता नाचता तिनं दिला बाळाला जन्म
वेस्ट मिडलॅण्ड : इंग्लडच्या वेस्ट मिडलॅण्डमध्ये एका नववधूने स्वत:च्याच लग्नात नाचता नाचता एका बाळाला जन्म दिला आहे. डिसेंबरमध्ये ही घटना घडली असून या प्रकारामुळे सारेच अवाक् झाले आहेत.
दि सन या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, १९ वर्षीय डैनी माउटफोर्ड आणि १८ वर्षीय कार्ल यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. डिसेंबर महिन्यात लग्न करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांच्या लग्नाची तारीख ठरली १८ डिसेंबर. १८ डिसेंबर रोजी ती ९ महिने २ दिवसांची गरोदर होती. लग्नासाठी तयार होऊन ती लग्नमंडपात आली. सुरळीतपणे लग्नही झालं. लग्न झाल्यानंतर ती आपल्या पतीसोबत नाचायला लागली तेव्हा त्या डान्सफ्लोअरवरच तिला कळा जाणवायला लागल्या. कळा जाणवू लागल्याने तिला लगेच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. ज्यादिवशी नवजोडप्याचं लग्न झालं त्याच दिवशी त्यांच्या बाळाचाही जन्म झाल्याने ते खुशीत आहेत.
आणखी वाचा - कॅन्सर असतानाही तिने सोडली नाही जिद्द, मृत्यूपूर्वी रुग्णालयात केलं लग्न
आणखी वाचा - त्यानं एंगेजमेंटला दिली तिला 19 कोटींची अंगठी
डॅनीला जानेवारीची प्रसुतीची तारीख दिली होती. त्यामुळे डिसेंबरमध्ये तिला बाळ होईल असं तिच्या नवऱ्याला वाटलं नव्हतं. म्हणूनच त्यांनी डिसेंबरमध्ये लग्न करण्याचं ठरवलं. मात्र नवव्या महिन्यातही तीने लग्नात ठेका धरला. आपल्या पतीसोबत तिने डान्स केला. म्हणूनच तिला कळा सुरू झाल्या. म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्येही ती जवळपास ६ तास कळा सहन करत होती. अखेर बाळाचा जन्म झाला. या बाळाचं नाव जॅस्मिन ठेवण्यात आलंय. बाळ आणि बाळंतीण एकदम सुखरूप असून बाळाचं वजन २.७ किलो आहे. दरम्यान, बाळाचा जन्म होण्याआधीच त्यांना लग्नाच्या बंधनात अडकायचं होतं म्हणून बाळाच्या जन्माआधीच त्यांनी लग्न करायचं ठरवलं होतं. पण बाळालाही येण्याची घाई झाली होती म्हणून आई-बाबांच्या लग्नाच्या दिवशीच बाळाने जन्म घेतला, असं म्हटलं जात आहे.