'या' पक्ष्याने केली ७५ वर्षीय मालकाची हत्या, हा आहे जगातला सर्वात धोकादायक पक्षी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 02:18 PM2019-04-16T14:18:22+5:302019-04-16T14:18:28+5:30
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका ७५ वर्षीय मार्विन हेजॉस नावाच्या व्यक्तीचा एका पक्ष्याने जीव घेतला.
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका ७५ वर्षीय मार्विन हेजॉस नावाच्या व्यक्तीचा एका पक्ष्याने जीव घेतला. ऐकायला थोडं विचित्र असलं तरी हे खरंय. या व्यक्तीला cassowary नावाच्या पक्ष्याने मारलं आहे.
(Image Credit : www.smh.com.a)
मीडिया रिपोर्टनुसार, मार्विन हेजॉस यांच्या फार्मवर ही धक्कादायक घटना घडली. cassowary पक्ष्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
मार्विन यांनी त्यांच्या फार्मवर दोन cassowary पक्षी पाळले होते. याबाबत फायर ब्रिगेडचे अधिकारी जेफ टेयलर यांनी सांगितले की, आतापर्यंत हे कळालं नाही की, मार्विनला एका cassowary मारलं की दोन. कारण त्याच्याकडे दोन cassowary होते.
'जिवंत डायनॉसॉर'
पक्ष्यांच्या या प्रजातीला 'जिवंत डायनॉसॉर' म्हणूणही ओळखलं जातं. हे पक्षी ६ फूट उंच असतात. त्यांचे पंजे फार धारदार असतात. यांना जगातल्या सर्वात धोकादायक पक्ष्यांच्या श्रेणीत ठेवलं गेलं आहे. हे पक्षी जास्त ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.