धक्कादायक! नोकरीवरून काढून टाकल्याचा राग, संतापलेल्या कार क्लीनरने सूड घेण्यासाठी फेकलं अॅसिड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 10:39 AM2023-03-17T10:39:03+5:302023-03-17T10:40:32+5:30
कामावरून कर्मचारी आणि कार मालक यांच्यात वाद झाला होता.
Shocking News: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये नुकतीच एक अशी घटना घडली जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. सेक्टर 75 मध्ये असलेल्या एका सोसायटीमध्ये एका कार क्लीनरने त्याचे काम नीट केले नाही, त्यामुळे साफसफाई करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या गोष्टीचा त्या कार क्लीनरला इतका राग आला की नोकरी गेल्याच्या सूडापोटी नाराज झालेल्या कार क्लीनरने चक्क अॅसिड फेकल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे.
नक्की काय घडले?
सेक्टर-75 मध्ये असलेल्या सोसायटीमध्ये साफसफाईच्या कामावरून कर्मचारी आणि कार मालक यांच्यात वाद झाला. त्याच्या कामावर समाधानी नसल्याने कार मालकरांनी त्याला त्या कामावारून हटवले. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 15 गाड्यांवर अॅसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी सर्व कार मालकांनी सेक्टर-113 पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सेक्टर-75 च्या मॅक्सब्लिस व्हाईटहाऊस सोसायटीचे AOA अध्यक्ष संजय पंडित म्हणाले की, रामराज 2016 पासून सोसायटीमध्ये कार साफ करत आहेत. आठवडाभरापूर्वी काही लोकांनी त्याला कामावरून काढून टाकले. सोसायटीतील इतर वाहनांची साफसफाई करण्याचे काम तो करत होता.
बुधवारी सकाळी सुरक्षा कर्मचार्यांनी रामराजला तळघर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुमारे 15 कारवर अॅसिड ओतताना पाहिले. या घटनेनंतर रामराज घटनास्थळावरून पळू लागला, मात्र गेटवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. AOA अध्यक्ष म्हणाले की, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. 15 गाड्यांच्या मालकांनी तक्रार दाखल करून रामराजला पोलिसांच्या ताब्यात दिले. अॅसिडमुळे सोसायटीतील 15 हून अधिक गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
सेक्टर-113 स्टेशन प्रभारी जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, रामराज हा हरदोईचा रहिवासी आहे आणि होशियारपूर गावात भाड्याच्या घरात राहतो. चौकशीत त्याने पोलिसांना कोणीतरी अॅसिड फेकल्याचे सांगत आरोप नामंजूर असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 427 (दुर्घटना) अंतर्गत या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे.