धक्कादायक ! बंगळुरुत भररस्त्यातून तरुणीचं अपहरण

By admin | Published: May 3, 2016 08:50 AM2016-05-03T08:50:03+5:302016-05-03T08:51:27+5:30

तरुणीचं तिच्याच घरासमोरुन अपहरण करुन बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Shocking Girl abduction in Bangalore | धक्कादायक ! बंगळुरुत भररस्त्यातून तरुणीचं अपहरण

धक्कादायक ! बंगळुरुत भररस्त्यातून तरुणीचं अपहरण

Next
>ऑनलाइन लोकमत - 
बंगळुरु, दि. 03 - तरुणीचं तिच्याच घरासमोरुन अपहरण करुन बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्चर्याची गोष्टी म्हणजे या 22 वर्षीय तरुणीचं अपहरण होत असताना रस्त्यावरुन जाणा-यांनी मात्र बघ्याची भुमिका घेतली. तरुणी मदतीसाठी ओरडत असतानादेखील मदतीला कोणीच धावून आलं नाही. हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 
 
23 एप्रिलला दक्षिण बंगळुरुमध्ये ही घटना घडली. ही पिडीत तरुणी रस्त्यावर फोनवर बोलत उभी होती. त्यावेळी एका व्यक्तीने तिचं अपहरण केलं. महत्वाचं म्हणजे ही तरुणी राहत असलेल्या घरासमोरुनच तिचं अपहरण करण्यात आलं. अपहरपणकर्त्याने तोंडावर कपडा बांधला होता. त्याने तिला ओढतच नेले. हे अपहरणनाट्य चालू असताना एक महिला आणि स्कूटरवर दोन व्यक्ती जाताना दिसत आहेत. मात्र त्यांच्यापैकी कोणीच मदतीला धावून गेलं नाही. ही पिडीत तरुणी मणिपूरची राहणारी असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
पिडीत तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 'माझं अपहरण करुन बांधकाम सुरु असलेल्या एका ठिकाणी नेऊन माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मी ओरडत असल्याने अपहरणरकर्त्याने लोक जमतील या भीतीने तेथून पळ काढला', अशी माहिती तरुणीने पोलिसांना दिली आहे. 'मी ओरडत असताना त्याने माझं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. बचाव करण्यासाठी मी त्याला चावले. त्याने मला मारहाण केल्यानंतर मी बेशुद्ध पडले होते', असंही तरुणीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. 
 
या घटनेनंतर पिडीत तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. तिने प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली होती. कर्नाटक महिला आयोगच्या अध्यक्षा मंजुला यांनी पोलिसांनी कारवाई घेतलीच पाहिजे असं म्हटलं आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.  
 

Web Title: Shocking Girl abduction in Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.