हॉस्पिटलमध्ये पत्नीला लावली होती सलाईन, पतीने बॉटलमद्ये सायनाईड टाकून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 03:12 PM2021-08-09T15:12:26+5:302021-08-09T15:19:20+5:30

३४ वर्षीय उर्मिला वसावा हिला छातीत दुखत असल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Shocking: Man mixes cyanide in glucose bottle to kill wife admitted in hospital | हॉस्पिटलमध्ये पत्नीला लावली होती सलाईन, पतीने बॉटलमद्ये सायनाईड टाकून केली हत्या

हॉस्पिटलमध्ये पत्नीला लावली होती सलाईन, पतीने बॉटलमद्ये सायनाईड टाकून केली हत्या

googlenewsNext


गुजरातच्या अंकलेश्वरच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये साधारण एक महिन्याआधी आपल्या पत्नीच्या ड्रिप बॉटलमध्ये म्हणजे सलाईनमध्ये सायनाइड विष टाकून तिची हत्या केली. याप्रकऱणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली. अंकलेश्वर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वैवाहिक कलहातून पतीने हे कृत्य केलं.

३४ वर्षीय उर्मिला वसावा हिला छातीत दुखत असल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आल्यावर हे प्रकरण उघड झालं. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालं की, वसावाचा मृत्यू सायनाईड विषामुळे झाला. अंकलेश्वरच्या एका कारखान्यात जिग्नेश पटेलने आपली पत्नी उर्मिला वसावाला इंजेक्शनच्या माध्यमातून विष दिलं.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सायनाइट दिल्यानंतरलगेच महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिच्या या मृत्यूबाबत तक्रार देण्यात आली होती. महिलेला उपचारादरम्यान आठ जुलैला हॉस्पिटलमद्ये दाखल करण्यात आलं होतं. ही घटना तेव्हा घडली होती जेव्हा हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित नव्हते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाल्यावर पोलिसांनी पटेल याला अटक केली.
 

Web Title: Shocking: Man mixes cyanide in glucose bottle to kill wife admitted in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.