बोंबला! २५ वर्षीय जावयासोबत पळून गेली ५० वर्षांची सासू, लग्नही केलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 05:12 PM2021-08-07T17:12:38+5:302021-08-07T17:13:01+5:30
इथे एकमेकांसोबत मुलगा आणि आईप्रमाणं असणारं नातं विसरून दोघे प्रेमात पडले. ५० वर्षीय सासू तिच्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या आपल्याच २५ वर्षीय जावयाच्या प्रेमात पडली.
प्रेमात वयाचं बंधन, जात-धर्म, देशांच्या सीमा नसतात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अशा प्रेमाची अनेक उदाहरणं पाहिली असतील. काही लोक तर नाती विसरून एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का देतात. काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये एक सासरा सूनेच्या प्रेमात पडल्याची आणि त्यातून मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली होती. आता उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे.
इथे एकमेकांसोबत मुलगा आणि आईप्रमाणं असणारं नातं विसरून दोघे प्रेमात पडले. ५० वर्षीय सासू तिच्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या आपल्याच २५ वर्षीय जावयाच्या प्रेमात पडली. धक्कादायक बाब म्हणजे हे इतक्यावरच थांबलं नाही तर दोघांनी प्रेमात असं पाऊल उचललं, ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण जाईल. (हे पण वाचा : सासू-सासऱ्यांनी सूनेकडे मागितले आपल्या मुलाचे स्पर्म, हैराण महिलेने सांगितली अडचण..)
प्रेमात आकंठ बुडालेल्या या सासू आणि जावयानं घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोघे घरातून पळून गेले आणि त्यांनी आयुष्यभर सोबत राहण्यासाठी लग्नही केलं. महिलेनं नुकतंच आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच तिचं आपल्या जावयावर प्रेम जडलं. यानंतर महिला आपल्या जावयासोबत घर सोडून पळून गेली. (हे पण वाचा : वरातीत आलेल्या पाहुण्यांनी केलं असं काही, मंडप सोडून पळाली नवरी; म्हणाली - मी त्याच्याशी लग्न कसं करू?)
सासू आणि जावाई घरातून पळून गेल्यावर १० महिने इकडे तिकडे सोबत राहिले. त्यानंतर ते घरी परतले. जेव्हा त्यांनी लग्न केल्याचं समजलं तर गावात आणि नातेवाईकांना एकच धक्का बसला. जेव्हा पती आणि आईच्या नात्याबाबत मुलीला माहिती झालं तेव्हा तिनंही गोंधळ घातला.
मात्र, सासू आणि जावयानं स्पष्ट सांगितलं की, त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि त्यांना सोबत राहायचं आहे. अखेर त्यांच्या हट्टापुढे नातेवाईकांनीही हार मानली आणि दोघांसोबतच नातं तोडलं आहे. मात्र, एकमेकांसोबत लग्न केल्यानं हे जोडपं आता आनंदी आहे.