बूटात लपवले १०० पेक्षा जास्त विषारी जिवंत कोळी; कारण वाचून तुम्हीही हादराल....
By Manali.bagul | Published: November 3, 2020 04:22 PM2020-11-03T16:22:41+5:302020-11-03T16:26:04+5:30
१०० पेक्षा जास्त जीवंत घातक कोळ्यांना एका बूटामध्ये प्लास्टिकच्या लहान-लहान डब्ब्यांमध्ये ठेवण्यात आलं होतं.
कोळीची टॅरेंटुला ही प्रजात खूप विषारी असते. फिलिपिन्स निनॉय एक्विनो इंटरनॅशनल एयरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी एका बूटांच्या बॉक्समधून हे जिवंत कोळी जप्त केले आहेत. कोळ्यांना लपवण्यासाठी भामट्यांनी चांगलीच शक्कल लढवली होती. पण पोलिसांच्या तावडीतून ते वाचू शकले नाहीत. १०० पेक्षा जास्त जीवंत घातक कोळ्यांना एका बूटामध्ये प्लास्टिकच्या लहान-लहान डब्ब्यांमध्ये ठेवण्यात आलं होतं.
या बूटाच्या पार्सलच्या खराब पॅकिंगकडे लक्ष गेल्यावर अधिकाऱ्यांना संशय आला. म्हणून त्यांनी बूटांच्या पार्सलची पाहणी करायला सुरूवात केली. त्यानंतर बूटाच्या आत आढळलेले इतके सारे कोळी पाहून अधिकारी हैराण झाले. प्लास्टिकच्या लहान लहान पिशव्यांमध्ये हे जिवंत कोळी बांधून ठेवण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी हे सर्व टॅरेंटुला कोळी, डिपार्टमेंट ऑफ एनव्हायरमेंट अँड नॅच्युरल रिसोर्सेज वाईल्ड लाईफ मॉनिटरिंग यूनिटला २९ ऑक्टोबर रोजी सोपवले आहेत. हे कोळी २८ ऑक्टोबरला जप्त केले होते. फिलिपिन्सच्या ब्युरो ऑफ कस्टम्सने हे टॅरेंटुला जप्त केले असून याचे फोटो आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे टॅरेंटुलाची जगभरात मोठी तस्करी केली जाते.
कोळ्यांचे प्रकार
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरात अठराशेपेक्षा जास्त प्रकारच्या कोळ्यांची नोंद झाली आहे. कोळ्यांची वर्गवारी त्यांच्या जाळे विणण्याच्या पद्धतीवरून केली जाते. कोळ्यांमध्ये असंख्य प्रकार असून मुंगीच्या आकारापासून ते हाताच्या पंजाएवढे मोठे कोळी आपल्या परिसरात असतात. आपल्याकडे जायंट वूड स्पायडर अर्थात महाकाय कोळी जंगलात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आम्ही लग्नाळू! लग्नासाठी मुलगी हवी, संपूर्ण शहरात पठ्ठ्यानं लावले बॅनर्स; संपर्क करण्याचं आवाहन
तंबूसारखे, नरसाळ्यासारखे जाळे विणणारा कोळी, जंगलातील झाडांच्या खोडातील पोकळीमध्ये जाळे विणणारा, जाळे पूर्ण झाल्यावर विशिष्ट द्रवाने जाळ्यावर स्वाक्षरी करणारा कोळी असे विविध प्रकारचे कोळी आढळतात. परदेशांत कोळ्यांना पाळण्याची हौस लोकांना आहे. ऑनलाइन आणि काही दुकानांमध्येही कोळी विक्रीसाठी उपलब्ध असतात. ७५ हजार रुपये किलोंनी विकली जातेय भारतातील 'ही' दुर्मिळ चहापावडर, जगभरातील मागणीत वाढ