बापरे! लॉकडाऊनमध्ये दातांचा डॉक्टर नाही, म्हणून या बाप-लेकाने केलं असं काही....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 04:50 PM2020-04-23T16:50:06+5:302020-04-23T17:01:10+5:30
एका व्यक्तीचा दात दुखायला लागला. पण सध्या लॉकडाऊन सुरू आहे. म्हणून डेंटिस्टची अपॉइंटमेट मिळाली नाही.
जेव्हाही दात दुखायला लागतो तेव्हा कधी एकदा दवाखान्यात जातोय असं वाटतं. असं म्हणतात की, दातांचं दुखणं हे खूप भयानक असतं. अशाीच एक घटना ब्रिटनमध्ये घटली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीचा दात दुखायला लागला. पण सध्या लॉकडाऊन सुरू आहे. म्हणून डेंटिस्टची अपॉइंटमेट मिळाली नाही. त्यानंतर या व्यक्तीने काय केलं हे वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. आपल्या मुलाची मदत घेऊन या व्यक्तीने दात काढून टाकला आहे.
या माणसाचं वय ३३ असून त्याचं नाव बिली टेलर आहे. या व्यक्तीने सांगितलं की, ''माझा एक दात इन्फेक्टेड झाल्यामुळे खराब झाला होता. डेंटिस्टशी संपर्क केल्यानंतर त्यांनी माझं नाव वेटिंग लिस्टमध्ये ठेवलं. मला ही परिस्थिती कधीपर्यंत सुरूळीत होईल याबाबत काही कल्पना नव्हती. हा खूपच वेदनादायक अनुभव होता. तोंड सुन्न होण्यासाठी मी आधी आईसपॅक लावला होता. त्यानंतर दात काढण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला मला असं वाटलं की २० मिनीटांचे काम आहे. पण तब्बल दीड तासपर्यंत केल्यानंतर दात काढण्यासाठी यश आलं.''
दात काढण्यासाठी आवश्यक असेलले पूर्ण टूल किट बिलीकडे होतं. इतकंच नाही तर वेदना कमी करण्यासाठी विस्की प्यायल्याचे बिली म्हणाला. पण दात काढून टाकल्यानंतर वेदना पूर्णपणे बंद झाल्या होत्या. बिलीला गेल्या दोन वर्षांपासून ही समस्या सतावत होती.
अनेकदा डॉक्टरची अपॉईंमेंट घेऊन सुद्धा बिलीला बरं वाटलं नव्हतं. शेवटी घरच्याघरी दात काढून टाकल्यानंतर अखेर बिलीला वेदनेपासून सुटका मिळाली आहे.