बोंबला! थेट पोलिसांसमोरच त्याने गॅस पास केला; अन् मग पोलिसांंनी 'असा' वसूल केला दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 06:08 PM2020-06-17T18:08:57+5:302020-06-17T18:18:59+5:30

या माणसाने पोलिसासमोर गॅस पास केल्यामुळे मोठी किंमत मोजावी लागली आहे

Shocking news man fined for 43000 rupees farting with full intent at police officers | बोंबला! थेट पोलिसांसमोरच त्याने गॅस पास केला; अन् मग पोलिसांंनी 'असा' वसूल केला दंड

बोंबला! थेट पोलिसांसमोरच त्याने गॅस पास केला; अन् मग पोलिसांंनी 'असा' वसूल केला दंड

Next

चारचौघात गॅस पास केल्यानंतर सगळ्यांची काय रिएक्शन असते. हे तुम्हाला माहितच असेल. गॅस पास करणं ही नैसर्गिक क्रिया असली तरी त्यामुळे येणारा दुर्गंध आणि आवाज यामुळे वातावरण खराब होत असतं. गॅस पास केल्यामुळे एका व्यक्तीला दंड भरावा लागला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. एका व्यक्तीला पोलिसांसमोर गॅस पास केल्यामुळे तब्बल ४३ हजार  रुपयांचा दंड भरावा लागला आहे. या माणसाने पोलिसांसमोर गॅस पास केल्यामुळे ५०० युरो म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे ४३ हजार  रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

एबीसी न्यूजच्या माहितीनुसार या व्यक्तीने पोलिसांसमोर मोठ्याने गॅस पास केल्यामुळे दंडाची रक्कम मागितली. ही घटना पाच जूनची आहे. तेव्हा हा व्यक्ती एका बाकड्यावर बसला होता. त्याने पोलिस कर्मचारी असल्याचे पाहूनही दुर्लक्ष केले आणि मोठ्याने गॅस पास केला. पोलिसांना हा प्रकार अजिबात आवडलेला नाही. म्हणून कारवाई करण्यात आली. या व्यक्तीने सार्वजनिक नियम तोडल्याचे पोलिसांना सांगितले आहे. 

हा सगळा प्रकार झाल्यानंतर या व्यक्तीने पोलिसांची माफी मागण्याचे किंवा बोलण्याचे सौजन्यही दाखवलेले नाही. या व्यक्तीचा बेशिस्तपणा दिसून आल्याने पोलिसांना कारवाई करावी लागली. याबबत माहिती पोलिसांनी सोशल मीडियावरून दिली आहे. 

बोंबला! 'इथे' लग्नात जावयाला हुंडा म्हणून दिले जातात 21 विषारी साप, त्याशिवाय होतंच नाही लग्न!

21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...

Web Title: Shocking news man fined for 43000 rupees farting with full intent at police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.