कधीच ऐकलं नसेल तुम्ही घटस्फोटाचं असं कारण, महिलेने पतीसोबत केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 12:30 PM2022-03-26T12:30:44+5:302022-03-26T12:31:18+5:30
Divorce : घटस्फोटाचं एक असं कारण समोर आलं आहे जे वाचून सगळेच हैराण झालेत. एका पतीने त्याचं दु:खं लोकांसोबत शेअर केलं आहे.
अनेकदा तुम्ही लोकांच्या घटस्फोटांची वेगवेगळी कारणे ऐकली किंवा वाचली असतील. काही आपसातील मदभेदांमुळे वेगळे होतात तर काही लोक कौटुंबिक हिंसेमुळे वेगळे होतात. पण अशात घटस्फोटाचं (Divorce Reason) एक असं कारण समोर आलं आहे जे वाचून सगळेच हैराण झालेत. एका पतीने त्याचं दु:खं लोकांसोबत शेअर केलं आहे.
घटस्फोटाचं अजब कारण
एका व्यक्तीने नुकताच त्याच्या घटस्फोटाच्या कारणाचा खुलासा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या व्यक्तीनुसार, त्याच्या पत्नीने त्याला केवळ या कारणाने घटस्फोट दिला की, त्याने सिंकमध्ये काही खरकटी भांडी तशीच ठेवली होती. घटस्फोटाचं हे कारण ऐकून तुम्हीही अवाक् झाले असाल.
वाढदिवसाच्या दिवशी धक्का
या व्यक्तीने 'डेली मेल'ला सांगितलं की, त्याचा ३४ वा वाढदिवस होता आणि त्या दिवशी त्याच्या पत्नीने त्याला मोठा धक्का दिला. एका ब्लॉग पोस्टमध्ये त्याने त्याचं लग्न मोडण्याच्या कारणाचा खुलासा केला. या व्यक्तीने हे सांगितलं की, घटस्फोटाचं हे कारण केवळ चुकीचंच नाही तर हास्यास्पद आहे.
घटस्फोटानंतर पत्नीने पतीला सांगितलं की, ती तिच्या मुलाला आपल्या सोबत घेऊन जात आहे. या व्यक्तीने सांगितलं की, तो जास्तकरून सिंकजवळ पाण्याचे ग्लास ठेवत होता. कधी कधी प्लेट्सही ठेवत होता. त्यासोबतच तो कपडेही इकडे-तिकडे ठेवत होता.
याच कारणाने महिलेने त्यांचं १२ वर्षांचं नातं तोडलं. पण काही दिवसांनी या व्यक्तीच्या लक्षात आलं की, या कारणांमुळे त्याचा घटस्फोट झालेला नाही. मुख्य कारण हे आहे की, त्याच्या पत्नीला त्याच्यासोबत रहायचंच नाहीये.
पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याचं जीवन अस्ताव्यस्त झालं. त्याने सांगितलं की, पत्नी नव्या नात्यासोबत लवकरच पुढे गेली. एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याने आपल्या सर्व भावना एक पेपरवर लिहिल्या. कारण तो नशेत होता तेव्हा त्याने या पेपरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.