धक्कादायक ! बलात्कारावेळी शांत राहिली म्हणून आरोपीची सुटका
By admin | Published: March 24, 2017 03:22 PM2017-03-24T15:22:45+5:302017-03-24T15:26:15+5:30
बलात्कार होत असताना पीडित तरुणीने आरडाओरड केली नाही म्हणून न्यायालयाने आरोपीची सुटका केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
रोम, दि. 24 - बलात्कार होत असताना पीडित तरुणीने आरडाओरड केली नाही म्हणून न्यायालयाने आरोपीची सुटका केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इटलीमधील न्यायालयाने हा निर्णय दिला असून संपुर्ण देशभरातून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
उत्तर इटलीमधील ट्युरिनमधील न्यायालयाने 46 वर्षीय बलात्कार आरोपीची सुटका केली आहे. सुटका करत असताना न्यायालयाने अजब तर्क लावला आहे. रुग्णालयाच्या बेडवर बलात्कार होत असताना महिलेने मदतीसाठी आरडाओरड केली नाही यामुळे आरोपीची सुटका करण्याचा अजब आणि धक्कादायक निर्णय न्यायालयाने दिला आहे. ट्युरिनमधील या न्यायालयाने गेल्या महिन्यात हा निर्णय सुनावला आहे.
'बलात्कार होत असताना पीडित तरुणीने इनफ म्हणणं हा कमकुवत प्रतिसाद असल्याचं', न्यायालयाने सांगितलं आहे. निर्णयात न्यायालयाने सांगितलं आहे की, 'बलात्कार होत असताना पीडित तरुणीने ना आरडाओरड केली, ना मदतीसाटी आवाज दिला. यावरुन तिच्यावर बलात्कार झाल्याचं सिद्ध होत नाही'.
'बलात्कार होत असताना महिला ओरडली नाही, रडलीही नाही, किंवा आरोपीला धक्काही दिला नाही. आम्ही विचारतो असं का ?', असे अजब सवाल न्यायाधीस जय यामंते मिनुची आपल्या निर्णयात उपस्थित केले आहेत. यावर पीडित तरुणीच्या वकिलाने तिचं शांत राहणं परिस्थिती किती वेदनादायक होती हे दर्शवत असल्याचा युक्तिवाद केला.
न्यायालयाच्या निर्णयानंतर मानवाधिकार संघटनांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. इटलीच्या कायदा मंत्री आंद्रेया ओरलँडो यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिका-यांना पुन्हा या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश देण्यात आला आहे.