रात्री हेडफोन लावून झोपला, सकाळी उठला तर झाला होता बहिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 01:12 PM2019-03-09T13:12:58+5:302019-03-09T13:23:09+5:30
धक्कादायक बाब म्हणजे सकाळी जेव्हा मुलगा उठला तेव्हा पूर्णपणे ऐकायला येणे बंद झाले होते. म्हणजे तो बहिरा झाला होता.
तायवानच्या तायचुंग येथून एक अजब बातमी समोर आली आहे. इथे एक विद्यार्थी रात्री कानाला हेडफोन लावून झोपला. धक्कादायक बाब म्हणजे सकाळी जेव्हा मुलगा उठला तेव्हा पूर्णपणे ऐकायला येणे बंद झाले होते. म्हणजे तो बहिरा झाला होता.
डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, तायवान एशिया यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये सध्या एका विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर्सनी सांगितलं की, या विद्यार्थ्याचा एका कान पूर्णपणे काम करणे बंद झालं आहे. अंदाज असा लावला जात आहे की, रात्री झोपेत त्याच्या एका कानातून हेडफोन निघाला असेल. तसं झालं नसतं तर तो दोन्ही कानांनी बहिरा झाला असता.
Dr. Tian Huiji Department of Otorhinolaryngology यांचं म्हणणं आहे की, झोपताना कानाला हेडफोन लावून झोपू नये. याने अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
आपल्या शरीरातील रक्तदाब रात्री दिवसाच्या तुलनेत स्लो डाउन होत असतो. रात्री आपल्या कानाच्या केसांपर्यंत फार कमी रक्त पोहोचतं. त्यामुळे रात्री हेडफोन लावणे दिवसाच्या तुलनेत अधिक नुकसानकारक असतं.
२०१८ मध्ये न्यू यॉर्क यूनिव्हर्सिटी द्वारे एक सर्व्हे करण्यात आला होता. यातून असं समोर आलं की, जास्त वेळ हेडफोनचा वापर केल्याने प्रत्येक पाचपैकी एका व्यक्तीची ऐकण्याची क्षमता कमी होत आहे.