बोंबला! ...म्हणून टायर नसूनही चालवली 'त्याने' कार, कारण ऐकल्यावर हैराण झाले पोलीस!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 02:12 PM2020-07-16T14:12:48+5:302020-07-16T14:17:14+5:30
विक्टोरिया पोलिसांनी १४ जुलैच्या सकाळी साधारण ३ वाजता Yarra रोडवर एक निसान पल्सर कार पाहिली. जेव्हा त्यांना कार का उभी आहे याचं कारण समजलं तर तेही हैराण झाले.
साधारणपणे ड्रायव्हिंग येणाऱ्या प्रत्येकाला गाडीचा टायर कसा बदलायचा हे माहीत असतं. पण जर ते माहीत नसेल तर तुम्हाला महागात पडू शकतं. काही तरूणांनी असाच विचित्र कारनामा केलाय. त्यांच्या कारचा टायर पंचर झाला, पण ते टायर न बदलताच तसे कार चालवत राहिले. काही वेळाने टायरची रिम दिसू लागली आणि गाडी जागेवर थांबली. पोलिसांना त्यांना पकडलं आणि फाइन लावला. ही घटना मेलबर्नची आहे.
रिपोर्टनुसार, विक्टोरिया पोलिसांनी १४ जुलैच्या सकाळी साधारण ३ वाजता Yarra रोडवर एक निसान पल्सर कार पाहिली. जेव्हा त्यांना कार का उभी आहे याचं कारण समजलं तर तेही हैराण झाले. पोलिसांनी सांगितले की, '१९ वर्षीय चालकाने सांगितले की, कारचा एक टायर पंचर झाला होता आणि त्यांना टायर कसा बदलावा हे माहीत नव्हतं. त्यामुळे ते तसेच कार चालवत राहिले. पण नंतर कार एका जागेवर थांबली.
पोलिसांनी या तरूणाची ब्रिदींग टेस्ट केली तर रिडींग ०.१६२ आलं. म्हणजे तो तरूण नशेत होता. पोलिसांनी कारवाई करत लगेच त्याचं लायसेन्स निलंबित केलं. तसेच त्याला ड्रिंक अॅन्ड ड्रायव्हिंगचा समन बजावण्यात आला.
या तरूणासोबत आणखी एक २२ वर्षीय तरूण होता. दोघेही म्हणाले की, यात आमची काहीच चुकी नाही की, टायर बदलता येत नाही. पण दोघांवरही लॉकडाऊनच्या नियमाचं उल्लंघन करण्यावरून दंड लावण्यात आला. दोघांना मिळून अडीच लाख रूपयांना दंड लावला.
शाब्बास रे पठ्ठ्या! ६ वर्षीय भावाने कुत्र्यापासून बहिणीला वाचवले, जखमी इतका झाला की ९० टाके पडले...