दोन तरूणींना एकाचवेळी डेट करत होता तरूण, दोघींनाही ते समजलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 04:17 PM2021-06-18T16:17:50+5:302021-06-18T16:23:52+5:30
एकाचवेळी अनेक लोकांना डेट करणं महागात पडू शकतं. यात विश्वासांची पायरीही तयार होऊ शकत नाही. एक व्यक्ती दोन महिलांना एकत्र डेट करत होता.
डेटिंगचा पहिला नियम हा असतो तुम्ही ज्याच्यासोबत आहात त्याच्याच सोबत रहा. एकाचवेळी अनेक लोकांना डेट करणं महागात पडू शकतं. यात विश्वासांची पायरीही तयार होऊ शकत नाही. एक व्यक्ती दोन महिलांना एकत्र डेट करत होता. काही दिवसांनी दोन्ही महिलांना याची खबर लागली. दोघींना समजली की, त्यांच्या बॉयफ्रेन्ड त्यांना दगा देतोय तर दोघांनी मिळून त्याला धडा शिकवला.
इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, दोन्ही महिलांना खबर लागली की, त्या गेल्या आठ महिन्यांपासून एकाच व्यक्तीला डेट करत आहेत. Kristen Bishop ला मार्चच्या अखेरपर्यंत एक व्हॉइस मेसेज आला होता. Sophie Miller ने तिला हा मेसेज पाठवला होता. ती सोफीला ओळखतही नव्हती. तिने सांगितलं की, रॉबर्ट(बदललेलं नाव)ला डेट करत आहे. त्यावेळी रॉबर्ट आणि क्रिस्टीन रिलेशनशिपमद्ये होते. आधी तर क्रिस्टीनला सोफीच्या या सांगण्यावर विश्वास बसला नाही. नंतर सोफीने क्रिस्टीनला फेसटाइम कॉल केला आणि दाखवलं की ती रॉबर्टच्या घरी आहे. (हे पण वाचा : हनीमूनच्या दिवशी पतीने केला ट्रान्सजेंडर असल्याचा खुलासा, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्...)
नंतर दोघींनी मिळून रॉबर्टला धडा शिकवण्याचा प्लॅन केला. क्रिस्टीन आणि रॉबर्ट दोघेही आठ दिवसांसाठी इस्तांबुलला जाणार होते. सोफीही तिथे पोहोचली. नंतर दोघी एअरपोर्टच्या बाथरूमध्ये भेटल्या. अचानक दोघीही रॉबर्टसमोर आल्या. (हे पण वाचा : पतीने केला पत्नीचा भांडाफोड, म्हणाला - पत्नीने मैत्रिणीसोबत अन् तिच्या पतीसोबत ठेवले संबंध)
नंतर त्यांनी रॉबर्टला सांगितलं की, जी बुकिंग क्रिस्टीनने रॉबर्टसोबत वेळ घालवण्यासाठी केलं होतं. ते तिने सोफीच्या नावाने केलं आहे. आता दोघींनाही रॉबर्टसोबत बोलायचं नाहीये. क्रिस्टीनने सांगितलं की, 'जेव्हा त्याने सोफीला बघितलं तेव्हा त्याची बोलती बंद झाली होती'. सोफी आणि क्रिस्टीनने ही ट्रिप एन्जॉय केली.