ईsssssss ! ही कंपनी ५ हजार रूपयांना विकत आहे वापरलेले टिश्यू पेपर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:45 PM2019-01-25T16:45:26+5:302019-01-25T16:45:55+5:30
सध्या कोण कशाचा व्यवसाय सुरू करेल याचा काहीच नेम नाही. तुम्ही म्हणाल असं काय झालं?
सध्या कोण कशाचा व्यवसाय सुरू करेल याचा काहीच नेम नाही. तुम्ही म्हणाल असं काय झालं? अहो वापरलेले कपडे, वापरलेली भांडी, टीव्ही, गाडी हे विकणं किंवा विकत घेणं यात काही गैर नाही किंवा असं केलंही जातं. पण अमेरिकेलीत एक कंपनी एक अशी वस्तू विकत आहे की, तुम्हाला किळस आल्याशिवाय राहणार नाही. या कंपनीने लोकांनी वापरलेले टिश्यू पेपर विकणे सुरू केले आहे.
काय आहे कारण?
या कंपनीने हे वापरलेले टिश्यू पेपर विकण्यामागे एक उद्देश सांगितला आहे. VaevTissue असं या कंपनीचं नाव असून कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर असं लिहिलं आहे की, वापरलेले टिश्यू ताप येण्यापासून बचाव करतो आणि रोग प्रतिकारक क्षमताही वाढवण्यास मदत करतात.
किंमत वाचून व्हाल थक्क
Wanna prepare for Flu season? Now you can buy used tissue and get sick when you want for $80, except that it's sold out. https://t.co/WSa7qnTFT0
या टिश्यूंची विक्री ऑनलाइन केली जात असून याची किंमत ७९.९९ डॉलर इतकी आहे. भारतीय मुद्रेत ही किंमत ५६०० रूपये इतकी होते. दरम्यान यूनिव्हर्सिटी ऑफ एरिझोनाचे प्राध्यापक चार्ल्स गेरबा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, याने व्हायरस तर पसरत नाही ना?
Vaev ships throughout North America and Internationally! 🇨🇦 https://t.co/ApeLwZTxwa
— VaevTissue (@VaevTissue) January 8, 2019
दरम्यान, या कंपनीवर सोशल मीडियात टिकाही होत आहे. तर काही लोक कंपनीची खिल्लीही उडवत आहे.