Shocking: 41 वर्षांपासून अन्नाचा एक कणही खाल्ला नाही! फक्त लिंबू-पाण्यावर जिवंत आहे ही महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 06:43 PM2022-09-27T18:43:16+5:302022-09-27T18:43:51+5:30
या महिलेच्या आहारासंदर्भात ऐकल्यानंतर, ही महिला अतापर्यंत जिवंत कशी, असा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहणार नाही. या महिलेचा जीवन प्रवास इतर लोकांच्या तुलनेत अत्यंत वेगळा आहे.
आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील, जे सातत्याने काही ना काही प्रयोग करत राहतात. यांपैकी काही प्रयोग तर विचित्र आणि आपल्याला समजण्यापलीकडचे असातात. एका महिलेची जीवनशैलीही काहीशी अशीच आहे. या महिलेच्या आहारासंदर्भात ऐकल्यानंतर, ही महिला अतापर्यंत जिवंत कशी? असा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहणार नाही. या महिलेचा जीवन प्रवास इतर लोकांच्या तुलनेत अत्यंत वेगळा आहे.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण -
व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या या महिलेने दावा केला आहे, की तिने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी अन्न घेणे बंद केले आहे. अर्थात संबंधित महिलेने सॉलीड आहार घेणे बंद केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या 41 वर्षांपासून ही महिला अन्नाचा कणही न खाता जिवंत आहे आणि ठणठणीत आहे. तर जाणून घेऊयात कोणत्या गोष्टींचे सेवनकरतात या व्हेएतनामच्या आजी?
फक्त लिंबू-पाण्यावर जिवंत -
उन्हाळ्याच्या दिवसांत आराम देणाऱ्या लिंबूपाण्याचा या महिलेच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. खरे तर गेली 41 वर्षे केवळ लिंबूपाण्यावरच ही महिला जिवंत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या जीवनशैलीचा महिलेच्या आरोग्यावर कसलाही वाईट परिणाम झालेला नाही. पाण्यात मीठ, साखर आणि लिंबाचा रस यातूनच आपल्या शरीराला पोषक द्रव्ये मिळतात, असा दावा ही महिला करते. एका डॉक्टरच्या सल्ल्याने महिलेने ही पद्धत अवलंबली होती.
झाले अनेक फायदे -
ही 63 वर्षीय महिला तिच्या वयापेक्षाही लहान वाटते. एवढेच नाही तर,या महिलेत योगा करण्याची क्षमता आहे. वयाच्या 21 व्या वर्षी या महिलेला रक्ताशी संबंधित आजाराने ग्रासले होते. तेव्हापासून या महिलेने लिंबू-पाणी पिऊन सॉलीड अन्न सोडायला सुरुवात केली होती. खरे तर ही पद्धत वैज्ञानिक नाही. यामुळे संबंधित महिलेची जगासमोर आपले नाव उघड करण्याची इच्छा नाही.