थोर तुझी माया! आईनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी चक्क पाय कापला, गरोदरपणात घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 10:58 AM2021-09-14T10:58:56+5:302021-09-14T10:59:06+5:30

आईने तिच्या कृत्यातून हे नेहमी दाखवून दिलं आहे की, ती तिच्या बाळावर आपल्या जीवापाड प्रेम करते. अशाच एका आईनं आपल्या मुलासाठी अक्षरश: प्रेमाची सीमा ओलांडली. आपल्या न जन्मलेल्या मुलासाठी तिनं चक्क पाय कापला.

shocking woman cuts her leg to save a baby during pregnancy | थोर तुझी माया! आईनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी चक्क पाय कापला, गरोदरपणात घेतला निर्णय

थोर तुझी माया! आईनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी चक्क पाय कापला, गरोदरपणात घेतला निर्णय

googlenewsNext

आई आपल्या मुलासाठी काहीही करु शकते आणि ते वेगळं सांगण्याची आता गरज नाही. आईने तिच्या कृत्यातून हे नेहमी दाखवून दिलं आहे की, ती तिच्या बाळावर आपल्या जीवापाड प्रेम करते. अशाच एका आईनं आपल्या मुलासाठी अक्षरश: प्रेमाची सीमा ओलांडली. आपल्या न जन्मलेल्या मुलासाठी तिनं चक्क पाय कापला.

या आईने आपल्या मुलाला सुरक्षितपणे जन्म देण्यासाठी आपल्या आयुष्याशी मोठी तडजोड केली आहे. तिच्या न जन्मलेल्या मुलासाठी, तिचा संपूर्ण पाय कापला आहे. ज्यामुळे या आईच्या धाडसाचं कौतुक लोकही करत आहेत आणि संपूर्ण प्रकरण तुम्हाला माहित झाल्यावर तुम्ही भावूक व्हाल.

तिला होता कॅन्सर
२८ वर्षीय कॅथलीन ओसबोर्न, यूकेच्या विस्बेकमध्ये राहते, तिला गरोदरपणात कळले की, तिच्या पायात गाठ आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ही कॅन्सरची गाठ आहे. डॉक्टरांनी तिला सांगितले की, ती तिच्या पोटातील मुलाला जन्म न देता म्हणजेच अबॉर्शन करुन, केमो थेरपी घेऊ शकते, अन्यथा तिला तिचा पाय कापावा लागेल. परंतु आपल्या पोटच्या मुलाला न गमावता आईने तिच्या न जन्मलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आपला पाय कापून टाकणे पसंत केले. या निर्णयानंतर, तिचा पाय गर्भधारणेच्या चौथ्या महिन्यात कापला गेला आणि मार्चमध्ये तिने प्रीमॅच्‍योर बाळाला जन्म दिला.

फक्त काहीच दिवस उरलेले.
कॅथलीनला यापूर्वी दोनदा कॅन्सर झाला होता. यावेळी तिला तिच्या बाळासाठी पाय कापावा लागला परंतु तरीही ती खूप आनंदी आयुष्य जगत आहे. द सनच्या वृत्तानुसार कॅथलीन म्हणते, 'मी माझ्या निर्णयावर खूश आहे. मला माझ्या २ मोठ्या मुलांसाठी एक बहीण हवी होती.
माझ्याकडे आता फक्त काही महिने किंवा वर्षे शिल्लक आहेत. या काळात, मला माझ्या मुलांसोबत वेळ घालवून छान आठवणी बनवायच्या आहेत. मुलंच आता माझ्या आयुष्यातील सर्व काही आहे, मला माझ्या स्वप्नांची पर्वा नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे, मला माझ्या मुलांसोबत आनंदाने जगायचे आहे.

Web Title: shocking woman cuts her leg to save a baby during pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.