Shocking! अचानक जमीन फाटली अन् तरूण त्यात गाडला गेला, धक्कादायक दृश्य पाहून उडाला लोकांचा थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 12:23 PM2021-07-19T12:23:45+5:302021-07-19T12:25:10+5:30

ही घटना धनबाद जिल्ह्याच्या केंदुआडीह भागातील आहे. इथे बीसीसीएलच्या आऊट सोर्सिंग प्रोजेक्टच्या शेजारी तरूण जिवंत जमिनीत गाडला गेलाय.

Shocking! Young man got buried alive in the earth Jharkhand | Shocking! अचानक जमीन फाटली अन् तरूण त्यात गाडला गेला, धक्कादायक दृश्य पाहून उडाला लोकांचा थरकाप

Shocking! अचानक जमीन फाटली अन् तरूण त्यात गाडला गेला, धक्कादायक दृश्य पाहून उडाला लोकांचा थरकाप

Next

झारखंडच्या (Jharkhand) धनबाद जिल्ह्यात रविवारी सकाळी एक खळबळजनक घटना घडली आहे. शौचास गेलेला तरूण अचानक जमिनीत सामावला (Man got buried alive) आहे. लोकांनी हा नजारा पाहिला तर त्यांचाही थरकाप उडाला. कुणालाही काही समजत नव्हतं की, नेमकं काय होतंय. लोक घटनास्थळी जाण्याची हिंमत करू शकले नाही.

ही घटना धनबाद जिल्ह्याच्या केंदुआडीह भागातील आहे. इथे बीसीसीएलच्या आऊट सोर्सिंग प्रोजेक्टच्या शेजारी तरूण जिवंत जमिनीत गाडला गेलाय. असं सांगितलं गेलं की, इथे राहणारा तरूण उमेश पासवान सकाळी शौचास जात होता. अचानक मोठा धमाका झाला आणि त्याच्या पायाखालची जमीन फाटली.

उमेशच्या काही लक्षात यायच्या आत  जमिनीत सामावला होता. या खड्ड्यातून धूरही निघत होता. कुणाला काही समजत नव्हतं की, काय झालंय. घडलेला प्रकार पाहून आजूबाजूचे लोक ओरडायला लागले. दृश्य इतकं भयानक होतं की, लोकांची घटनास्थळी जाण्याची हिंमतच होत नव्हती.

दरम्यान तेथूनन जात असलेल्या उमेश पासवानच्या भावाने हे दृश्य पाहिलं तर त्यालाही धक्का बसला. भावाला वाचवण्यासाठी तो त्याच्यााकडे धावत गेला. भावाला खड्ड्यातून काढण्यासाठी तो धडपड करत राहिला. एका भावाला दुसऱ्या भावाचा जीव वाचवण्यासाठी धडपडताना पाहून इतरही काही लोक तिथे आले.

मोठ्या प्रयत्नांनंतर खड्ड्यात गाडल्या गेलेल्या तरूणाला बाहेर काढण्यात यश आलं. पण तो गंभीरपणे भाजलेला होता. त्याला लगेच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
 

Web Title: Shocking! Young man got buried alive in the earth Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.