गाववालों! 'लग्न करून द्या, नाही तर जीव देतो', १२ तास पाण्याच्या टाकीवर 'शोले'तील वीरू बनला तरूण!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 03:40 PM2021-04-10T15:40:43+5:302021-04-10T15:46:01+5:30
शुक्रवारी रात्री ८ वाजता एक तरूण प्रेयसीसोबत लग्न लावून देण्याची मागणी घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला. इतकंच नाही तर त्याने आत्महत्येची धमकीही दिली.
बिहारच्या सुपौलमध्ये प्रेयसीला मिळवण्यासाठी प्रियकराने 'शोले' स्टाइल आंदोलन केलं. शोले सिनेमात ज्याप्रमाणे विरू बसंतीला मिळवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढतो तसाच हा तरूणही गावातील पाण्याच्या टाकीवर चढला. तो पाण्याच्या टाकीवर चढून रात्री ८ वाजतापासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत हायव्होल्टेज ड्रामा करत राहिला.
शुक्रवारी रात्री ८ वाजता एक तरूण प्रेयसीसोबत लग्न लावून देण्याची मागणी घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला. इतकंच नाही तर त्याने आत्महत्येची धमकीही दिली. यावेळी प्रशासन त्याला लग्न लावून देऊ असं सांगत राहिलं, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. तरूण कधी तरूणीला समोर आणण्याची तर कधी तिच्या वडिलांना समोर आणण्यासाठी सांगत राहिला. हेच करत रात्रीची सकाळ झाली. लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. फायर ब्रिगेडची गाडीही बोलवण्यात आली. पण तो काही खाली उतरला नाही. (हे पण वाचा : देवानेच दिली शिक्षा! मंदिरात चोरी करायला गेलेल्या चोराचे दानपेटीत अडकले हात आणि मग...)
असे सांगितले जात आहे की, प्रियकर तरूण प्रशांत कुमारचं मधुबनी जिल्ह्यातील एका तरूणीवर प्रेम होतं. तरूण आणि तरूणी लग्नासाठी तयार आहेत. पण तरूणीच्या वडिलांचा या लग्नास नकार आहे. अनेक प्रयत्न करून झाल्यावर प्रशांतने शोलेतील वीरूचा मार्ग अवलंबला आणि पाण्याच्या टाकीवर चढला. (हे पण वाचा : ठरलं तर! अडीच फूट उंचीच्या अजीमला मिळाली नवरी, वाचा काय करते मुलगी आणि बघा तिचा फोटो!)
शुक्रवारी रात्री तो हॉस्पिटल जवळच्या पाण्याच्या टाकीवर चढला. वर चढण्याआधी त्याने एक सुसाइड नोटही लिहिली होती. यातच त्याने प्रेम प्रकरणावरून टाकीवर चढत असल्याचा खुलासा केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरूणाला खाली उतरण्याची विनंती केली. पण प्रशांत या गोष्टीवर अडून राहिला की, जोपर्यंत तरूणीला तिथे बोलवून त्याचं लग्न लावून दिलं जात नाही तोपर्यंत तो खाली उतरणार नाही. इकडे सकाळ झाली पण तो टाकीवरच बसून होता. तेच जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला सकाळी ८ वाजता टाकीवरून खाली उतरवलं.