चोर हवे आहेत! चोरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, तासाला मिळणार ४५०० रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 01:35 PM2018-12-12T13:35:00+5:302018-12-12T13:35:17+5:30

एका ठिकाणी चक्क चोरांसाठी नोकरीच्या जागा निघाल्या आहेत. तेही थेड इंग्लंड शहरात. इथे एका कपड्यांच्या दुकानाच्या महिला दुकानदारला चोर हवे आहेत.

Shop owner job offer to pay skilled thieves 4500 rupees an hour to steal from her shop | चोर हवे आहेत! चोरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, तासाला मिळणार ४५०० रुपये!

चोर हवे आहेत! चोरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, तासाला मिळणार ४५०० रुपये!

Next

नोकरी म्हटलं की, त्यासाठी सुशिक्षित, उच्च शिक्षित लोकांचा शोध घेतला जातो. पण एका ठिकाणी चक्क चोरांसाठी नोकरीच्या जागा निघाल्या आहेत. तेही थेट इंग्लंड शहरात. इथे एका कपड्यांच्या दुकानाच्या महिला दुकानदारला चोर हवे आहेत. बसला ना धक्का? पण हे खरंय. चोराला चोरी करण्याची नोकरीची संधी देण्यात आली आहे. बरं यात आश्चर्याची बाब म्हणजे ही महिला या कामासाठी त्या चोरांना प्रत्येक तासाला ४५०० रुपये पगार म्हणून द्यायला तयार आहे. 

जिथे नोकरी तिथे करावी लागेल चोरी

या महिलेने नुकतीच बार्क डॉट कॉमवर या नोकरीची माहिती पोस्ट केली आहे. यात सांगण्यात आलं आहे की, चोराला एका तासाच्या कामासाठी ६४ डॉलर म्हणजेच साधारण ४५०० रुपये दिले जातील. चोराला त्याच दुकानात प्रत्येक तासाला चोरी करावी लागेल. आता हे काय नवीन म्हणून तुम्हीही विचारात पडला असाल ना? खरंतर ही महिला दुकानदार चोरीच्या घटनांना वैतागली आहे. त्यामुळे ती आधी चोरांना चोरी करायला सांगेल आणि नंतर त्यांना विचारेल की, चोरी कशी केली. जेणेकरुन भविष्यात दुकानाच्या सुरक्षेत वाढ करता येईल. 

हे कशासाठी?

या महिला दुकानदारचं नाव गुपित ठेवण्यात आलं आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मला माहीत आहे की, हे फारच वेगळं प्रकरण आहे. पण सुट्ट्यांमध्ये आमच्या दुकानातील चोरीच्या घटना फार वाढतात. असं गेली कित्येक वर्ष होत आहे. त्यामुळे मला यातून सुटका मिळवायची आहे. मला प्रोफेशनल चोरांच्या मदतीने हे जाणून घ्यायचं आहे की, सुरक्षेत काय कमतरता आहे'. 

या महिलेने हेही सांगितले की, त्यांच्या दुकानात सीसीटीव्हीसहीत अनेक सुरक्षा व्यवस्था आहेत. अशात ही नोकरीची संधी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. 'मिरर' ने दिलेल्या बार्क डॉट कॉमच्या फाऊंडरला याबाबत विचारणा केली. ते म्हणाले की, 'ही नोकरी थोडी वेगळी आहे. पण आम्हाला आशा आहे की, महिलेला हवा असणारा कर्मचारी मिळेल'.

Web Title: Shop owner job offer to pay skilled thieves 4500 rupees an hour to steal from her shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.