सणासुदीचा काळात ऑनलाइन खरेदी करताय? मग, 'हे' काम अजिबात करू नका, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 12:46 PM2023-10-01T12:46:52+5:302023-10-01T12:47:57+5:30
या सणासुदीच्या काळात एखादी छोटीशी चूकही लोकांना महागात पडू शकते.
सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. तसेच, येत्या काही दिवसांत देशात अनेक सण येणार आहेत. सण-उत्सवातही लोक भरपूर खरेदी करतात. अशा परिस्थितीत लोकांनी काही गोष्टींबाबत खूप काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना सणासुदीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. या सणासुदीच्या काळात एखादी छोटीशी चूकही लोकांना महागात पडू शकते. अशा परिस्थितीत सणासुदीच्या निमित्ताने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्याबद्दल जाणून घ्या...
सणांच्या काळात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन सेल पाहायला मिळतात. ज्यामध्ये लोक स्वस्त दरात वस्तू खरेदी करू शकतात. मात्र, काही फसवणूक करणारे लोकही याचा फायदा घेऊ शकतात. फसवणूक करणारे ऑनलाइन माध्यमातून लोकांना स्वस्त वस्तूंचे आमिष दाखवतात आणि अशा प्रकारे लोकांची फसवणूक करतात. यासाठी लोकांनी ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, कोणत्याही संशयास्पद लिंक, ऑफर इत्यादींच्या जाळ्यात अडकणार नाही, याकडे पण लक्ष दिले पाहिजे.
अनावश्यक खर्च
सणासुदीच्या काळात अनेक ठिकाणी डिस्काउंट ऑफर चालतात. यादरम्यान लोकांना कमी किमतीत अनेक गोष्टी मिळू शकतात. अशा परिस्थितीत, जेव्हाही खरेदीला जाल तेव्हा अनावश्यक खर्च करू नका. दरम्यान, असे होऊ शकते की, एखादी गोष्ट तुम्हाला आकर्षित करेल परंतु तुम्हाला त्याची गरज नाही, त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही त्या वस्तू खरेदी करू नका आणि अनावश्यक खर्च टाळा.
क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर
तुम्हाला काही अत्यावश्यक वस्तू ऑनलाइन किंवा ऑफलाइन ऑर्डर करायच्या असतील, तर सणासुदीच्या काळात तुम्ही अनेक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे भरून अतिरिक्त डिस्काउंट मिळवू शकता. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही ऑनलाइन खरेदीसाठी जाता किंवा वस्तू मागवता तेव्हा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे कोणत्या ऑफर उपलब्ध आहेत, हे लक्षात ठेवा. याचाही लोक फायदा घेऊ शकतात.