वाह, मानलं गड्या! आईच्या हातची खीर विकून 'असे' करोडपती बनले हे पुण्याचे बहिणभाऊ
By Manali.bagul | Updated: January 25, 2021 15:16 IST2021-01-25T15:09:07+5:302021-01-25T15:16:52+5:30
पुण्यातील एका La Kheer Deli’ (LKD) आउटलेटची खीर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची खीर खाण्याचा आनंद घेता येऊ शकतो.

वाह, मानलं गड्या! आईच्या हातची खीर विकून 'असे' करोडपती बनले हे पुण्याचे बहिणभाऊ
आईच्या हातच्या जेवणाची मजाच काही वेगळी असते. तुम्ही जगभरात कुठेही गेलात तरी तुम्हाला आईच्या हातच्या जेवणाप्रमाणे चांगले जेवण मिळणार नाही. आईच्या हातचं जेवायला मिळणं जणूकाही स्वर्गसुखाप्रमाणेच आहे. हिवाळा असो किंवा उन्हाळा खीर खाण्यासाठी कोणत्याही ऋतूचे बंधन नसते. पुण्यातील एका La Kheer Deli’ (LKD) आउटलेटची खीर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची खीर खायचा आनंद घेता येऊ शकतो. मसलन, न्यूट्रेला, ब्राऊनी, चॉकलेट, ओरियो आणि गुलकंद फ्लेवरची खीर तुम्हाला पुण्यात खायला मिळू शकते.
दोन भावडांनी सुरू केली खीरीची विक्री
विक्री शिवांग सूद आणि शिवाका सूद या दोघा भावंडांनी २०१९ ला खीरीची सुरू केली. त्यांची खीर भारतातील अनेक शहरांमध्ये प्रसिध्द आहे. द बेटर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार २७ वर्षीय शिंवाग सुद यांनी सांगितले की, ''जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी आई खीर बनवायची. संपूर्ण कुटुंब खूप प्रेमाने खीर खायचं. २०१७ मध्ये माझ्या बहिणीनं काहीतरी वेगळे प्रयोग करून खीर तयार करायचं ठरवलं. तिने खीरीत एक चमचा ओरिओ आणि एक चमचा नुटेला घातल्यानं या खीरीची चवच बदलली.''
आईनं मेहनत घेतली
पुढे त्यांनी सांगितले की, ''माझ्या आईनं गुलकंद आणि ब्राऊनी घालून खीर बनवली होती. कुटुंबातील इतर लोकांनाही ही खीर खूप आवडली. इतकचं नाही तर आईनं सगळ्याच नातेवाईकांना ही खीर खाऊ घातली. ज्यांनी ज्यांनी ही खीर खाल्ली ते सगळेचजण बोटं चाखत राहिले. ''
अशी झाली सुरूवात
यांनी दिलेल्या माहितीनुसार ''सुरूवातीला आम्ही स्पोर्ट्स स्टार्टअप सुरू केलं होतं. त्यानंतर माझी बहिण शिविकानं मला आयडीया दिली. त्यानंतर आमच्या घरात तयार केली जाणारी खीर इतरांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला भांडवल कमी असल्यामुळे आम्ही पुण्यातील औंढमध्ये हातगाडीवर खीर विकायला सुरूवात केली. यात वेगवेगळ्या फ्लेवर्सचा समावेश होता.'' वाढलेलं वजन घटवण्यासाठी नीता अंबानींनी केले 'हे' २ उपाय; तुमच्यासाठीही ठरतील प्रभावी
हळूहळू बिझनेस वाढत गेला
शिवांगने सांगितले की, ''पहिल्या दिवशी मित्रांच्या मदतीने खीरीचे ४४ डब्बे विकले. त्यानंतर आईनं ८२ डब्बे खीर बनवली. तिसऱ्या दिवशी १०० डब्बे खीर तयार झाली. मार्केटिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रॅण्डिंग सुरू केले. लोकांचा चांगला प्रसिसाद मिळायला सुरूवात झाली. लोकांनी प्री ऑर्डर करायला सुरूवात केली. त्यानंतर २०१८ मध्ये पुण्याच्या जेओएम रोडवर एक दुकान भाड्यानं घेतलं. आमची पहिली कमाई ३३ लाख रुपये इतकी होती. त्यानंतर २०१८ मध्ये हा आकडा ८४ लाखांपर्यंत पोहोचला. २०१९ आणि २०२० मध्ये कमाई १ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली. '' वाह रे नशीब! २० वर्षांपासून बिल्डींगमध्ये साफसफाई करायची; अन् एकेदिवशी घरच गिफ्ट मिळालं
आईने नोकरी सोडली
पुण्यातील 'ला खीर देली' हे दुकान आजही खूप फेमस आहे. यात सगळ्यात जास्त मेहनत सोनिया सुद यांची आहे. ५२ वर्षीय सोनिया यांनी आपल्या मुलांना मदत करण्यासाठी शाळेतील शिक्षकाची नोकरी सोडली आणि त्यांना या व्यवसायात मदत करायचं ठरवलं.