कधी उंदरासारखं दिसणारं हरीण पाहिलं का? तब्बल ३० वर्षांनंतर आढळून आलं 'हे' हरीण.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 12:29 PM2019-11-14T12:29:53+5:302019-11-14T12:37:03+5:30

सिल्वर-बॅकेड चेवरोटाइन एक हरीणाची लहान प्रजाती आहे. याला माउस हरीण असंही म्हटलं जातं.

Silver backed chevrotain has been found in in the forests of vietnam | कधी उंदरासारखं दिसणारं हरीण पाहिलं का? तब्बल ३० वर्षांनंतर आढळून आलं 'हे' हरीण.... 

कधी उंदरासारखं दिसणारं हरीण पाहिलं का? तब्बल ३० वर्षांनंतर आढळून आलं 'हे' हरीण.... 

Next

सिल्वर-बॅकेड चेवरोटाइन एक हरीणाची लहान प्रजाती आहे. याला माउस हरीण असंही म्हटलं जातं. मात्र, डायनोसॉरसारखीच हरीणाची ही प्रजातीही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. समोरून उंदरासारखे दिसणाऱ्या या हरीणाच्या पाठीवर चांदीसारखा रंग असतो. त्यामुळे त्यांना सिल्वर-बॅकेड चेवरोटाइन किंवा माउस हरीण म्हटलं जातं. नेचर इकॉलॉजी अ‍ॅन्ड इव्होल्यूशन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, हा प्राणी आजपासून तब्बल ३० वर्षांआधी बघितला गेला होता. आता पुन्हा एकदा व्हिएनामच्या जंगलात हे हरीण दिसलं.

या प्राण्याचा समावेश रेस्ट लिस्टमधे म्हणजेच लुप्त होणाऱ्या दुर्मिळ प्राण्यांच्या लिस्टमध्ये करण्यात आला आहे. सिल्वर-बॅकेड चेवरोटाइनबाबत सर्वातआधी १९१० मध्ये माहिती मिळाली होती. हे हरीण व्हिएतनाममधील हो ची मिन्ह शहरापासून साधारण ४५० किलोमीटर दूर न्हा ट्रांगजवळ आढळून आलं.

१९९० नंतर हे प्राणी न आढळल्याने तज्ज्ञांनी हे गृहीत धरलं होतं की, शिकारीमुळे हे प्राणी लुप्त झाले असतील. कोणत्याही जंगली प्राण्यांची लुप्त होण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे जंगलांची कत्तल आणि दुसरं म्हणजे बेकायदेशीर शिकार.

लाइबनिट्स इन्स्टिट्यूट फॉर जू अ‍ॅन्ड वाइल्ड लाइफ रिसर्चमध्ये पीएचडीचे अभ्यासक आणि ग्लोबल वाइल्ड लाईफ कंजर्व्हेशनसोबत काम करणारे एन नगुयेन म्हणाले की, सिल्वर-बॅकेड चेवरोटाइन अजून लुप्त झाले नाहीत. यासाठी नगुयेनने स्थानिकांसोबक तज्ज्ञांना त्या ठिकाणी घेऊन गेले जिथे हे हरीण आढळून आलं. 

नगुयेन म्हणाले की, जेव्हा आम्ही कॅमेरा ट्रॅपची तपासणी केली जेव्हा आम्हाला आश्चर्य झालं. आम्ही सिल्वर फ्लॅक्ससोबत सिल्वर-बॅकेड चेवरोटाइनचे फोटो पाहिले. दक्षिण पूर्व आशिया खासकरून व्हिएतनाममध्ये बेकायदेशीर शिकार खूप वाढली आहे. त्यामुळे या प्राण्यांची प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. 


Web Title: Silver backed chevrotain has been found in in the forests of vietnam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.