टॉयलेटमध्ये इंटिमेट झालेल्या कपलचा व्हिडीओ रेकॉर्ड होता तरूण आणि मग झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 05:15 PM2021-08-17T17:15:28+5:302021-08-17T17:18:37+5:30
कुप्पुसामी कार्तिकला दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करण्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आणि त्यानंतर त्याला तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
सार्वजनिक शौचालयाच्या एका रूममद्ये शारीरिक संबंध ठेवत असलेल्या ३६ वर्षीय दाम्पत्याचं व्हिडीओ रेकॉर्डींग करणं एका ३६ वर्षीय व्यक्तीला महागात पडलं आहे. या व्यक्तीला सोमवारी १७ आठवड्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यूज एशिया चॅनलच्या वृत्तानुसार, कुप्पुसामी कार्तिकला दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करण्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आणि त्यानंतर त्याला तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
पब्लिक टॉयलेटमद्ये आंघोळ करत असलेल्या कपलचा व्हिडीओ
ही घटना बिशन-आंग मो कियो पार्कच्या एका सार्वजनिक शौचालयातील आहे. जिथे कार्तिकने एका रूममध्ये एका कपलचा आंघोळ करतानाचा आणि संबंध ठेवतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. दोन दिवसांनंतर त्याने त्यांची तिथेच वाट पाहिली. त्याला वाटलं ते पुन्हा इथे येथील आणि पुन्हा व्हिडीओ काढता येईल. (हे पण वाचा : प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेन्डला इंग्रजीत फेल होण्याची होती भीती, बॉयफ्रेन्ड मुलगी बनून तिचा पेपर द्यायला गेला आणि....)
कार्तिकने त्याच्या फोनमध्ये तीन व्हिडीओ रेकॉर्ड केले आणि त्यांचे चार ते पाच नग्न फोटो काढले. ज्यात त्या दोघांचा चेहराही दिसत होता. तो १९ नोव्हेंबर २०२० ला पुन्हा पार्कमद्ये गेला आणि वेगवेगळ्या शौचालयात त्याने तीन व्हिडीओ रेकॉर्ड केले. ज्यातील एकात एका अज्ञात महिला शौचालयात जाताना दिसली.
नंतर २२ वर्षीय व्यक्तीने पोलिसांना बोलवलं आणि सांगितलं की, त्याने या व्यक्तीला पकडलं आहे जो त्याच्या प्रेयसीला आक्षेपार्ह स्थितीत बघत होता. कार्तिकला अटक करण्यात आली आहे आणि त्याचा फोनही ताब्यात घेतला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.