बोंबला! सिंगलपणाच्या साडेसातीला कंटाळून तरूणाने तयार केलं डेटिंग अॅप, फक्त महिलांनाच एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 12:24 PM2019-11-28T12:24:56+5:302019-11-28T12:28:55+5:30
भर तारूण्यात सिंगल राहणं, एकटं राहणं हे अनेकांच्या चांगलंच जिव्हारी लागतं. कारण त्यांना अनेक प्रयत्न करूनही जोडीदार मिळत नसतो.
(Image Credit : mensline.org.au)(प्रातिनिधीक छायाचित्र)
भर तारूण्यात सिंगल राहणं, एकटं राहणं हे अनेकांच्या चांगलंच जिव्हारी लागतं. कारण त्यांना अनेक प्रयत्न करूनही जोडीदार मिळत नसतो. प्रेमाच्या शोधात आजची पिढी वेगवेगळ्या आयडिया करतात, इतकेच नाही तर वेगवेगळ्या डेटिंग अॅप्सचाही आधार घेतात. डेटिंग अॅप्स तर अलिकडे तरूणांसाठी प्रेम शोधण्यासाठी सर्वात आवडतं माध्यम आहे.
डेटिंग अॅप जरी तरूणांसाठी फायदेशीर असलं तरी प्रत्येकालाच इथे प्रेम मिळतं असं नाही. काही लोकांना यावर सतत रिजेक्शन मिळतात. हे लोक चॅटींग तर अनेकांशी करतात, पण त्यांना खरं प्रेम काही कुणाकडून मिळत नाही. बरं अलिकडे अॅप्सची संख्या इतकी वाढली आहे की, यावर मॅच किंवा राइट स्वाईप मिळणं फारच सोपं राहिलेलं नाही.
अशाच एका सिंगल तरूणाचा एक भन्नाट किस्सा समोर आला आहे. या तरूणाच्या मागे लागलेली साडेसाती दूर करण्यासाठी त्याने असं काही केलं की, त्यावर तुम्हाला वाचून धक्का बसेल. या तरूणाने स्वत: एक डेटिंग अॅप तयार केलं. Singularity असं या अॅपचं नाव आहे.
पण हे अॅप काही इतर डेटिंग अॅपसारखं अजिबातच नाही. कारण या अॅपवर केवळ महिला साइन अप करू शकतात. पुरूष यावर साइन अप करू शकत नाहीत. खास बाब म्हणजे या अॅपवर केवळ एकच पुरूष असणार तो म्हणजे ज्याने अॅप तयार केलं तो. Aaron Smith असं या तरूणाचं नाव आहे.
Aaron Smith म्हणाला की, तो तरूणींचं अटेंशन मिळवण्यासाठी दुसऱ्या तरूणांसोबत स्पर्धा करून करून थकला होता. बस झालं या कारणाने त्याच्या डोक्यात ही भन्नाट आयडिया आली आणि त्याने अॅप तयार केलं.