काय सांगता! दारूच्या एका ग्लासाची किंमत वाचून व्हाल अवाक्, ४० लाखात विकले गेले 'लक्झरी शूज'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 03:38 PM2021-03-10T15:38:08+5:302021-03-10T15:42:34+5:30
हे लक्झरी शूजवर वार टाइम लीडर्सचे इनिशिअल्सची एम्ब्रॉयडरी केली आहे. हे शूज एका मोठ्या ब्रॅंडी ग्लाससोबत लिलावात विकण्यात आले आहेत.
एका शूजच्या जोडीची किंमत किती असू शकते? जर तुम्हाला कुणी सांगितलं की, ४० लाख रूपये. तर नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. मात्र, ब्रिटनमध्ये एका शूजच्य जोडीला इतकी किंमत मिळाली आहे. तुम्ही म्हणाल इतकी किंमत का? तर हे शूज खास होते. द्वितीय महायुद्धा दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान सर विंस्टन चर्चिल (Winston Churchill) यांच्या मखमली शूज जवळपास ४०, ००० पाउंडमध्ये लिलावात विकले गेले आहेत.
खास का आहेत हे शूज?
हे लक्झरी शूजवर वार टाइम लीडर्सचे इनिशिअल्सची एम्ब्रॉयडरी केली आहे. हे शूज एका मोठ्या ब्रॅंडी ग्लाससोबत लिलावात विकण्यात आले आहेत. हा ग्लास ब्रिटनचे माजी पंतप्रधान सर विंस्टन चर्चिल यांचा आहे. शूज २९ सेंटीमीटर लांब आणि सोन्याच्या धाग्यांपासून वार टाइम लीडर्सच्या नावाचे पहिले अक्षर तयार केले आहे. (हे पण वाचा : आता बोला! कधी लाकडाच्या राखेने घासली जात होती भांडी, आता बदामाच्या भावात विकली जात आहे राख....)
हे शूज १९५० च्या दशकातील सांगितले जात आहे. लिलावात यांची आधी यांची किंमत १० हजार पाउंड आणि १५ हजार पाउंड मिळेल असा अंदाज होता. पण एका व्यक्तीने हे ३९, ०४० पाउंड म्हणजे ३९,५२,४४७ रूपयात खरेदी केले. तर त्यांच्या ब्रॅंडी ग्लासची किंमत ७ ते १० हजार पाउंड मिळेल असा अंदाज होता. पण ते १८,३०० पाउंडमध्ये विकले गेले. यूकेतील एका प्रायव्हेट कलेक्टरकडे या वस्तू होत्या.