आपल्याच 'बहिणी' सोबत तरूणाने केलं लग्न, आई-वडिलांना मनवण्यासाठी केलं हे काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 12:52 PM2023-04-05T12:52:35+5:302023-04-05T12:52:51+5:30

लग्नाची ही अजब घटना फिनलॅंडमधील आहे. सोशल मीडियावर यावर लग्नाची चर्चा रंगली आहे. तरूणाचं नाव मटिल्डा आणि तरूणीचं नाव सामुली आहे.

Sister brother become bride and groom boy convince family, know the twist | आपल्याच 'बहिणी' सोबत तरूणाने केलं लग्न, आई-वडिलांना मनवण्यासाठी केलं हे काम...

आपल्याच 'बहिणी' सोबत तरूणाने केलं लग्न, आई-वडिलांना मनवण्यासाठी केलं हे काम...

googlenewsNext

Girl Marriage With Brother : कुणासोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय फार मोठा असतो आणि हा आयुष्यातील फार महत्वाचा भाग असतो. अशात जगभरातून नात्यांबाबत अशा घटना वाचायला मिळतात ज्या वाचून हैराण व्हायला होतं. ज्यावर लोक फार चर्चा करतात. काही दिवसांआधी अशीच एक घटना समोर आली ज्यामुळे लोक अवाक् झाले. एका भाऊ-बहिणीने एकमेकांसोबत लग्न केलं.

मीडिया रिपोर्टनुसार, लग्नाची ही अजब घटना फिनलॅंडमधील आहे. सोशल मीडियावर यावर लग्नाची चर्चा रंगली आहे. तरूणाचं नाव मटिल्डा आणि तरूणीचं नाव सामुली आहे. दोघेही सख्खे भाऊ-बहीण नाहीत. यांच्या नात्यात आणि त्यांच्या आई-वडिलांच्या नात्यात मोठा ट्विस्ट बघायला मिळतो.

हेही सांगण्यात आलं की, तरूणाची आई आणि तरूणीचे वडील यांनी तीन वर्षाआधी एकमेकांसोबत लग्न केलं होतं. पण तरूण आणि तरूणी लग्नाआधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. तरूणाच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दोघांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांचे आई-वडील एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर जेव्हा आई-वडिलांनी लग्न केलं तेव्हा या दोघांनी आपल्या लग्नासाठी त्यांना तयार केलं.

तरूणाने हे सांगून आई-वडिलांना या लग्नासाठी तयार केलं की, ते आधीपासून एकमेकांना ओळखत होते आणि तुम्ही जर लग्न केलं नसतं तर आम्ही सावत्र भाऊ-बहीण नसतो. त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांना यावर काही समस्या नव्हती आणि त्यांनी लग्नाला परवानगी दिली. हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, तरूण आणि तरूणी आधी कपल होते, नंतर सावत्र भाऊ-बहीण झाले. आता दोघांनी लग्न केलं आणि सुखी संसार करत आहेत.

Web Title: Sister brother become bride and groom boy convince family, know the twist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.