बहिणीचा पतीसोबत हनीमूनला जाण्याचा होता प्लान, भाऊही बॉयफ्रेंडला घेऊन येतो म्हणाला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 01:13 PM2024-01-20T13:13:05+5:302024-01-20T13:14:51+5:30
एका तरूणीचा भाऊ तिच्यासोबत हनीमूनवर जाण्याचा हट्ट धरून बसला आहे. हैराण करणारी बाब म्हणजे तो त्याच्यासोबत आपल्या बॉयफ्रेंडलाही घेऊन जाणार आहे.
नव्यानेच लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हनीमून फारच खास असतो. यानिमित्ताने ते कुठेतरी फिरायला जातात आणि दोघेही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात. याच कारणाने हनीमूनवर परिवारातील लोक त्यांच्यासोबत जात नाहीत. पण विचार करा की, जर एखाद्या व्यक्तीने कपलसोबत हनीमूनवर जाण्याचा हट्टच धरला तर? अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरूणीचा भाऊ तिच्यासोबत हनीमूनवर जाण्याचा हट्ट धरून बसला आहे. हैराण करणारी बाब म्हणजे तो त्याच्यासोबत आपल्या बॉयफ्रेंडलाही घेऊन जाणार आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर असे अनेक ग्रुप्स आहेत जिथे लोक आपलं खरं नाव लपवून आपल्या समस्यांबाबत सांगतात आणि यूजरकडून त्यावर सल्ला विचारतात. असंच एका तरूणीने केलं. तिने तिच्या हनीमूनबाबत एक असा अनुभव शेअर केला जो हैराण करणारा आहे. तरूणीने सांगितलं की, तिचा भाऊ एक समलैंगिक आहे आणि त्याला एक बॉयफ्रेंडही आहे. 25 वर्षीय या महिलेने आपल्या 27 वर्षीय पतीसोबत एक वर्षाआधी लग्न केलं होतं. पण त्यावेळी ते काही कारणाने हनीमूनला जाऊ शकले नव्हते. आता त्यांच्या लग्नाला 1 वर्ष होत आलं आहे आणि ते अमेरिकेच्या हवाईला जाण्याचा प्लान करत आहेत.
बहिणीसोबत हनीमूनवर जाण्याचा हट्ट
त्यांचा प्लान बनतच होता की, तरूणीचा भाऊ म्हणाला की, त्यालाही त्यांच्यासोबत हनीमूनला आपल्या बॉयफ्रेंडसोबत चलायचं आहे. बहिणीने त्याला समजावलं की, ही काही सामान्य ट्रिप नाही. हा एक हनीमून आहे ज्यावर केवळ कपल जाऊ शकतात. तर भाऊ म्हणाला की, त्यालाही हनीमूनचा अनुभव घ्यायचा आहे. त्यालाही त्याच्या बॉयफ्रेंडसोबत हातात हात घेऊन फिरायचं आहे.
पुढे बहीण म्हणाली की, तू हे सगळं करू शकतो पण त्यासाठी तुला वेगळं जावं लागेल. तिच्यासोबत नाही. तेव्हाच तो विवाहित कपलसारखं एन्जॉय करू शकेल. तर तिचा भाऊ रागावला आणि तो म्हणाला की, मला माहीत आहे की, आपल्या देशात समलैंगिक विवाहाला मंजूरी नाही. जिथे ते जाणार आहेत तिथेही समलैंगिकतेला मंजूरी नसेल गरजेचं नाही. कदाचित तेथील लोक खुल्या विचारांचे असतील. त्यामुळे त्याला त्यांच्यासोबत जायचं आहे.
लोकांनी दिली तरूणीला साथ
तरूणीनुसार, तिचे आई-वडिलही या गोष्टीच्या सपोर्टमध्ये आहेत की, त्याने बहिणीसोबत जावं. आता तरूणी वैतागली आहे आणि विचार करत आहे की, आपल्या प्लानबाबत भावाला सांगू नये. अशात तिने सोशल मीडियावर लोकांची मते मागितली आहेत. तर लोकांनी तिला साथ दिली आणि म्हणाले की, ती तिच्या जागेवर बरोबर आहे. तर काही म्हणाले की, कुठे जाणार आणि थांबणार हे भावाला सांगूच नका.