झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी! ऑफिसमध्ये काम नाही तर झोपा काढा अन् 1 लाख कमवा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 12:28 PM2020-09-01T12:28:25+5:302020-09-01T12:35:36+5:30
ऑफिसमध्ये काम नाही तर झोपा काढून पैसे कमवण्याची सुवर्णसंधी देशातील एक कंपनी देत आहे.
नवी दिल्ली - सध्याच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी सर्वच जण प्रचंड मेहनत करतात. मात्र सतत तेच काम करून अनेकदा कंटाळा येतो. तर काहींना काम करतानाही झोप येत असते. अशा झोपाळू लोकांसाठी आता एक खूशखबर आहे. ऑफिसमध्ये काम नाही तर झोपा काढून पैसे कमवण्याची सुवर्णसंधी देशातील एक कंपनी देत आहे. ज्या लोकांना सतत झोपणं प्रिय असेल अशा लोकांना कंपनी झोपण्यासाठी पगार देणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, Wakefit नावाच्या कंपनीने Sleep Internship असा एक प्रोग्राम समोर आणला आहे. या इंटर्नशिप दरम्यान दररोज 9 तास झोपायचं आहे. जर लागोपाठ 100 दिवस तुम्ही हे झोपण्याचं काम करू शकलात तर यासाठी 1 लाख रूपये दिले जाणार आहेत. हे काम मिळवण्यासाठी तुम्हाला कंपनीला हा विश्वास द्यावा लागेल की, झोप तुमच्यासाठी किती प्रिय आहे आणि का? इंटर्नशिप प्रोग्राम दरम्यान कंपनी व्यक्तीच्या झोपेच्या पद्धतीवरही लक्ष ठेवणार आहे.
कंपनीच्या या इंटर्नशीपसाठी कोणतीही डिग्री असली तरी हरकत नाही. मात्र तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये झोपला असाल तर तुम्ही यासाठी परफेक्ट आहात. तसेच बेडवर गेल्यानंतर 10 ते 20 मिनिटांत झोपावं लागेल. गोंधळ, आवाज असलेल्या ठिकाणीदेखील तुम्हाला झोप लागायला हवी. Wakefit ही बंगळुरूतील कंपनी असून त्यांनी त्यांच्या स्लीप इंटर्नशिपमधून लोकांना नऊ तासांच्या झोपेसाठी एक लाख रुपये कमवण्याची संधी दिली आहे.
स्लिप एक्सपर्ट, आहारतज्ज्ञ, फिटनेस तज्ज्ञ यांचं मार्गदर्शनही ही कंपनी उपलब्ध करून देणार आहे. सोशल मीडियावर कमी वेळ घालवत असाल, ऑनलाईन लेख वाचण्यात कमी स्वारस्य असणाऱ्या व्यक्तींना प्राध्यान्य दिलं जाणार आहे. याआधीही काही महिन्यांपूर्वी या कंपनीने स्लिपिंग इंटर्नसाठी वॅकन्सी काढल्या होत्या. तेव्हा जवळपास 1.7 लाख लोकांनी या इंटर्नशीपसाठी नोंदणी केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बॉयफ्रेंडला घेऊन ती ऑस्ट्रेलियाला गेली खरी पण झालं असं काही...; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण?https://t.co/DmfSYAmhF9
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2020
महत्त्वाच्या बातम्या
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! आणखी 100 ट्रेन धावण्याची शक्यता, लवकरच मिळू शकतो दिलासा?
"'मन की बात'च्या व्हिडीओवरील 'डिस्लाईक' मागे काँग्रेस"
बापरे! अचानक गेली वीज, तब्बल 20 तास ट्रेनमध्ये अडकले हजारो प्रवासी
भयंकर! लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने 7 मुलांनी केला 8 वर्षीय मुलीवर बलात्कार
ऐकावं ते नवलच! पतीच्या पासपोर्टवर 'ती' बॉयफ्रेंडला घेऊन गेली ऑस्ट्रेलियाला अन्...