मोबाइलमधील फेसलॉकही नाही सुरक्षित, झोपेत असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा दुरुपयोग!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 01:06 PM2019-04-11T13:06:30+5:302019-04-11T13:11:58+5:30

चेहऱ्याची ओळख करुन फोनचं लॉक उघडल्या जाणाऱ्या फेशिअल रिकग्निशन लॉक सिस्टीम असलेल्या मोबाइलची चांगली मागणीही वाढली आहे.

Sleeping Chinese man robbed money as smartphone facial recognition system | मोबाइलमधील फेसलॉकही नाही सुरक्षित, झोपेत असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा दुरुपयोग!

मोबाइलमधील फेसलॉकही नाही सुरक्षित, झोपेत असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा दुरुपयोग!

Next

(Image Credit : Medium)

आजकाल वेगवेगळ्या नव्या टेक्नॉलॉजीसह बाजारात स्मार्टफोन येत आहेत. यात चेहऱ्याची ओळख करुन फोनचं लॉक उघडल्या जाणाऱ्या फेशिअल रिकग्निशन लॉक सिस्टीम असलेल्या मोबाइलची चांगली मागणीही वाढली आहे. पण ही टेक्निक सुद्धा आता सुरक्षित राहिली नाही. ताजं उदाहरण चीनचं आहे. इथे एका व्यक्तीच्या चेहऱ्याचा वापर करुन चोरांनी त्यांच्या बॅंकेतून लाखो रुपये लंपास केले होते. 

जेझियांग प्रांतात राहणाऱ्या युआन नावाच्या व्यक्तीने दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार दिली की, त्याच्या बॅंक अकाऊंटमधून साधारण १.२५ लाख रुपये अचानक गायब झाले आहेत. जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली गेली तेव्हा समोर आलं की, त्याच्या दोन मित्रांनी त्याच्या मोबाइलमध्ये असलेल्या वी-चॅट अॅपमधून फेसलॉक टेक्निकचा वापर करुन पैसे अकाऊंटमधून ट्रान्सफर केले होते. 

(Image Credit : MacRumors)

या व्यक्तीच्या दोन्ही मित्रांना अटक करण्यात आली आहे आणि त्याच्याकडून पैसेही परत घेतले गेले आहेत. पण त्या व्यक्तीकडे कोणत्या कंपनीचा फोन होता हे पोलिसांनी जाहीर केलेले नाही. पण या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीच्या फोनमध्ये असलेली फेसलॉक टेक्निक विश्वसनीय नव्हती. कारण अशा टेक्निकमध्ये व्यक्तीचे डोळे बंद असेल तर चेहऱ्याचा वापर करुन फोन अनलॉक नाही केला जाऊ शकत. पण व्यक्तीच्या फोनमध्ये अशी काही सिस्टीम नव्हती. 

(Image Credit : Pond5)

आजच्या काळात स्मार्टफोनमध्ये फेसलॉक टेक्निकचा वापर एक सुरक्षा फीचर म्हणून केला जातो. पण अनेक स्मार्टफोन कंपन्या यासाठी आयरिस स्कॅनिंगचा(डोळ्यांचं स्कॅनिंग) वापर करत नाही. आयरिस स्कॅनिंगशिवाय फोन अनलॉक करण्यात वेळही कमी लागतो. 
शांघाय नेटवर्क सिक्युरिटीचे फाउंडर तान जियानफेंग म्हणाले की, फिंगरप्रिंट आणि फेसलॉक उपयोगी टेक्निक आहे. पण हे पासवर्ड आणि पिनची जागा घेऊ शकत नाहीत. लोकांनीही खासगी माहिती पासवर्ड आणि पिनच्या मदतीनेच सुरक्षित ठेवली पाहिजे.

 

Web Title: Sleeping Chinese man robbed money as smartphone facial recognition system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.